हार्दिक पांड्याची ट्‌वेन्टी-२० स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 March 2020

फॉर्मात आलेल्या हार्दिक पंड्याने डी. वाय. पाटील ट्‌वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत पुन्हा अष्टपैलू कामगिरी केली.

मुंबई : फॉर्मात आलेल्या हार्दिक पंड्याने डी. वाय. पाटील ट्‌वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत पुन्हा अष्टपैलू कामगिरी केली. त्याने १ चौकार आणि चार षटकारांसह २९ चेंडूंत ४६ धावांची खेळी केल्यानंतर ३९ धावांत तिघांना टिपले. त्यामुळे रिलायन्स-१ संघाने डी. वाय. पाटील ‘अ’ संघाचा सात धावांनी पराभव केला. रिलायन्स-१ संघातून खेळताना शिखर धवननेही ४३ धावांची शानदार खेळी साकार केली.

संक्षिप्त धावफलक :

बीपीसीएल :२० षटकांत १९०-४ (अखिल हेरवाडकर ६५, आकर्षित गोमेल ३६, शिवम दुबे नाबाद ३३, राहुल त्रिपाठी नाबाद २३, अली मूर्तझा २-३२) वि. वि. आरबीआय : २० षटकांत १७६-८ (सायन मोंडल ५२, दीपक हुडा ४०, सुमित घाडीगावकर ३४,  ज्योत छाया २४; शिवम दुबे ३-२६; सागर उदेशी २-२१, परिक्षित वालसंगकर २-३४).

रिलायन्स -१ : २० षटकांत २०५-४ (अनमोलप्रीत सिंग ९३, हार्दिक पंड्या ४६, शिखर धवन ४३; सुबोध भाटी २-२४) वि. वि. डी वाय पाटील -अ : २० षटकांत १९८-९ (शुभम रांजणे ४३, रिंकून सिंग ३६, हरप्रीत सिंग २६, दिनेश कार्तिक २३; दिग्विजय देशमुख ३-२५, हार्दिक पंड्या २-३९).

आयकर : २० षटकांत २१७-५ (स्वप्नील साळवी ५२, अभिमन्यू चौहान ४४, गौकव जठार नाबाद ४४, रोहित दहिया नाबाद  ४४, जय चौहान २-२६) पराभूत वि. पश्‍चिम रेल्वे : १९ षटकांत २१८-५ (मृणाल देवधर ६८, असात खान पठाण ६७, अहाद मलिक  ५६; रोहित दहिया २-४१).

सेनादल : १८.३ षटकांत १८३ (मोहित अहलवात ५७, लाखन सिंग ४०, शुभम रोहिला २३, नकुल शर्मा २१; रोहन राजे ३-३५, आवेश खान २-२५, अमीर गनी २-३४) पराभूत वि. इंडियन ऑईल :१९.४ षटकांत १८७-८ (आदित्य तरे ५६, सिद्धेश लाड ३१, रोहन राजे ३०, अभिषेक शर्मा २२, अतित सेठ नाबाद २१, निशान सिंग ३-४२, अर्जुन बामल २-३०, शक्ती मालविया २-२३).
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News