देशासाठी आणि सरकारच्या डिजिटल धोरणासाठी दूरसंचार क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे : सुनील मित्तल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 February 2020

देशातील दूरसंचार क्षेत्र मागील साडेतीन वर्षांपासून अडचणीत आहे.

नवी दिल्ली : देशातील दूरसंचार क्षेत्र मागील साडेतीन वर्षांपासून अडचणीत आहे. या क्षेत्राच्या हितासाठी सरकारने यातून मार्ग काढण्याची आवश्‍यकता आहे, असे मत आघाडीची दूरसंचार कंपनी भारती एअरटेलचे सर्वेसर्वा सुनील मित्तल यांनी व्यक्त केले आहे.

दिल्लीत अर्थमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरची बैठक आटोपल्यावर पत्रकारांशी संवाद साधत असताना मित्तल यांनी हे मत व्यक्त केले. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाने ‘ॲडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू’संदर्भात (एजीआर) दिलेल्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या प्रश्‍नावर चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना मित्तल म्हणाले, की देशासाठी आणि सरकारच्या डिजिटल धोरणासाठी दूरसंचार क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. हे क्षेत्र टिकाव कसा धरेल यावर लक्ष सरकारने लक्ष केंद्रित करण्याची आवश्‍यकता आहे. ‘एजीआर’ भरण्यासंदर्भातील नियोजनाची घोषणा एअरटेलने याआधीच केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News