तापसी - प्रियांशु 'या' चित्रपटातून करणार स्क्रीन शेअर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 19 March 2020
  • अभिनेता प्रियांशु पेनयुलीला ‘भावेश जोशी सुपरहिरो’ चित्रपटामुळे फारच प्रसिद्धी मिळाली.

अभिनेता प्रियांशु पेनयुलीला ‘भावेश जोशी सुपरहिरो’ चित्रपटामुळे फारच प्रसिद्धी मिळाली. आता लवकरच तो अभिनेत्री तापसी पन्नूची मुख्य भूमिका असणारा ‘रश्‍मी रॉकेट’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे.

या चित्रपटात तो तापसीच्या नवऱ्याच्या भूमिकेत आहे. प्रियांशु तापसीसोबत काम करण्यासाठी फारच उत्सुक आहे. आपल्या भूमिकेबाबत प्रियांशु सांगतो,‘या चित्रपटात मी एका आर्मी ऑफिसरची भूमिका साकारत आहे आणि मला याचा खूप अभिमान वाटतो आणि ही भूमिका साकारणं माझ्यासाठी एक प्रकारची जबाबदारीच आहे.’ दिग्दर्शन आकर्ष खुराना यांचे आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News