बुद्धिबळ स्पर्धेत तन्मय गिरीशने पटकावले विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 7 March 2020
  • या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कु. तन्मय गिरीश गाडगीळ याला प्राप्त झाले, तर द्वितीय अंकुर प्रमोद जोशी व तृतीय बक्षीस उत्कर्ष दयानंद च्यारी यांना प्राप्त झाले.

सत्तरी येथील श्री सिद्धीविनायक मंदिर सभागृहात श्री सिद्धीविनायक युवा संघ आंबेडेतर्फे आयोजित  बुद्धीबळ स्पर्धेत कु. तन्मय गिरीश गाडगीळ यांनी विजेतेपद पटकावले आहे.नगरगाव पंचायत भागातील मुलांचे बुद्धीबळाच्या खेळाकडे आकर्षण वाढविण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या उद्‍घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून सातोडे येथील ज्येष्ठ नागरिक गजानन बर्वे व युवा उद्योजक अंकित जोशी उपस्थित होते. 

गजानन बर्वे यांनी दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्‍घाटन केले. बर्वे यांनी विचार मांडून बुध्दीबळसारख्या खेळाची गरज व्यक्त केली. या स्पर्धेत एकूण ३८ स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कु. तन्मय गिरीश गाडगीळ याला प्राप्त झाले, तर द्वितीय अंकुर प्रमोद जोशी व तृतीय बक्षीस उत्कर्ष दयानंद च्यारी यांना प्राप्त झाले. तसेच विनायक मराठे, सुमित गावकर, साईमा गावकर, महादेव हरवळकर, सुजल हरवळकर, अथर्व गाडगीळ, वेदांत पर्येकर व साईच्छा गावकर यांना इतर पारितोषिके प्राप्त झाली. स्पर्धेचे पंच म्हणून बाळकृष्ण खाडिलकर व कु. चिन्मय गाडगीळ यांनी काम पाहिले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News