स्वाती मार्केला नागरी सेवा राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020
  • झारखंडचे क्रीडा सचिव राहुल शर्मा यांच्या हस्ते त्यांना बोर्ड प्राईज देवून सन्मानित करण्यात आले.

अकोला झारखंडे येथे २० ते २८ फेब्रुवारीदरम्यान अखिल भारतीय नागरी सेवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अकोला जीएसटी कार्यालयातील राज्यकर निरीक्षक स्वाती मार्के यांनी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले.

बुद्धिबळ या क्रीडा प्रकारात त्यांनी यशस्व कामगिरी करीत ६ पैकी ६ सामने जिंकून महाराष्ट्र संघाला कांस्य पदक मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. झारखंडचे क्रीडा सचिव राहुल शर्मा यांच्या हस्ते त्यांना बोर्ड प्राईज देवून सन्मानित करण्यात आले. अखिल भारतीय नागरी सेवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला पदक मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News