स्वप्नील जोशीचे वेबसिरीजमध्ये पदार्पण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 19 March 2020
  • अभिनेता स्वप्नील जोशीची रोमॅण्टीक, चॉकलेट बॉय ही इमेज प्रेक्षकांसमोर आहे.
  • आपल्या भूमिकांमध्ये नावीन्य आणण्याचा तो सतत प्रयत्न करत असतोच.

अभिनेता स्वप्नील जोशीची रोमॅण्टीक, चॉकलेट बॉय ही इमेज प्रेक्षकांसमोर आहे. आपल्या भूमिकांमध्ये नावीन्य आणण्याचा तो सतत प्रयत्न करत असतोच. आता त्याच्या अशाच एका भूमिकेची जोरदार चर्चा सुरू आहे.

‘समांतर’ या वेबसीरिजमधून त्याने डिजिटल विश्‍वात पदार्पण केलं. सुहास शिरवळकर यांच्या ‘समांतर’ या कादंबरीवर आधारित ही वेबसीरिज तीन दिवसांमध्येच ८० लाखांहून अधिक प्रेक्षकांनी पाहिली आहे. स्वप्नीलबरोबरच तेजस्विनी पंडितही यामध्ये मुख्य भूमिका साकारत आहे.

वेबसीरिजचं दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केलं आहे. अर्जुन सिंग बरान, कार्तिक डी. निशाणदार यांच्या जीसिम्स कंपनीने या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. तेजस्विनी, स्वप्नील, सतीश या त्रिकुटाच्या या पहिल्याच वेबसीरिजचा डिजिटल माध्यमावर बोलबाला आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News