'माझी शाळा व गाव तंबाखूमुक्त करणार’ तलासरीतील विद्यार्थ्यांची शपथ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 6 March 2020

तालुक्‍यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेवजी सिगलपाडा केंद्र वेवजी येथे विद्यार्थी, शिक्षक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि ६०० हून अधिक पालकांनी तंबाखू न खाण्याची शपथ घेतली आहे

तलासरी : तालुक्‍यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेवजी सिगलपाडा केंद्र वेवजी येथे विद्यार्थी, शिक्षक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि ६०० हून अधिक पालकांनी तंबाखू न खाण्याची शपथ घेतली आहे. ‘मी तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणार नाही आणि इतरांना करू देणार नाही. माझी शाळा व गाव तंबाखूमुक्त करणार’, अशी शपथ लक्ष्मण ननवरे यांनी उपस्थितांना दिली.

राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने राज्यात तंबाखूमुक्त शाळा अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या धोरणाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून शाळेत हा उपक्रम राबवण्यात आला. ‘माझी शाळा, तंबाखूमुक्त शाळा’ या उपक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा निरू उराडे, सर्व सदस्य, सरपंच सरिता उराडे, मुख्याध्यापिका चिखलीकर, संजय चौगुले, प्रशांत शेळके, जयगणेश तांडेल, अमोल वराडे आदी उपस्थित होते.

या अभियानात शाळांच्या मुख्याध्यापकांनी शाळेत तंबाखू सेवनास बंदी असल्याची नोटीस लावून, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी, पालक, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य यांना याबाबत माहिती देण्यासाठी नोटिशीचे वाचन करण्यात आले. शाळेच्या गेटजवळ नोटीस लावण्यात आली आहे.

या वेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्थेच्या निकषांबाबत आढावा घेण्यात आला. शाळेच्या परिसरात धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे गुन्हा आहे, असे फलक लावण्यात आले आहेत.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News