विद्यार्थ्यांनी संशोधन करत राहिले पाहिजे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 17 March 2020
  • गणित हा विविध क्षेत्राचा पाया आहे. या विषयाला आपल्या संस्कृतीत मोठी परंपरा आहे.
  • देशात थोर गणित शास्त्रज्ञ होऊन गेले असून, या विषयात विद्यार्थ्यांनी संशोधन करत राहिले पाहिजे, असे मत लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य डॉ. एस. बी. निमसे यांनी व्यक्त केले.

सातारा : गणित हा विविध क्षेत्राचा पाया आहे. या विषयाला आपल्या संस्कृतीत मोठी परंपरा आहे. देशात थोर गणित शास्त्रज्ञ होऊन गेले असून, या विषयात विद्यार्थ्यांनी संशोधन करत राहिले पाहिजे, असे मत लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य डॉ. एस. बी. निमसे यांनी व्यक्त केले.

येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये गणित विषयाची दोन दिवसांची राष्ट्रीय परिषद नुकतीच उत्साहात झाली. त्यात परिषदेचे उद्‌घाटन म्हणून प्राचार्य डॉ. निमसे बोलत होते. त्यावेळी प्राचार्य डॉ. के. जी. कानडे, विभागप्रमुख प्रा. डॉ. जे. डी. यादव, परिषदेचे संयोजक डॉ. डी. आर. हसबे, डॉ. टी. बी. जगताप, प्रा. बी. एन. नलवडे उपस्थित होते. या परिषदेत राज्याच्या विविध भागातील महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी सहभागी झाले होते. मूलभूत आणि प्रात्यक्षिक गणितातील नवीन संशोधन गणिताचा वेगवेगळ्या क्षेत्रात होत असलेला वापर आणि गणित संशोधन क्षेत्रातील संधी या विषयावर ही कार्यशाळा उत्साहात झाली. 

परिषदेत मद्रास आयआयटीचे प्रा. पी. वीरमनी यांनीही मार्गदर्शन केले. नगर येथील डॉ. श्रद्धा इंगळे, नागपूर विद्यापीठाचे प्रा. जी. एस. खाडेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. बी. एन. वाफारे यांनी विषयाची मांडणी केली. यावेळी संशोधन पत्रिकांचे सादरीकरण करण्यात आले. 

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी प्रा. शिवानंद गोरनाळे, डॉ. अशोक देशपांडे, प्रा. श्रीमती एस. एच. ठक्कर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी घेण्यात आलेल्या गणित प्रश्‍नमंजूषा स्पर्धेस प्राध्यापक, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परिषद यशस्वी करण्यासाठी प्रा. टी. ए. शेलार, प्रा. व्ही. आर. कदम, प्रा. एस. टी. शेळके, प्रा. एस. बी. पवार, प्रा. जी. व्ही. घाटगे, प्रा. आर. एस. मोरे, प्रा. गौरी मोरे यांनी परिश्रम घेतले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News