विद्यार्थ्यांनो उद्याचा आदर्श नागरिक व्हा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 9 March 2020

श्री श्री रविशंकर गुरुकुलच्या वतीने शनिवारी आयोजित आनंद मेळावा व वार्षिक बक्षीस वितरणप्रसंगी डॉ. नदाफ बोलत होते. डॉ. जितेंद्र कानडे अध्यक्षस्थानी होते.

अणदूर : आजचा विद्यार्थी हा उद्याचा आदर्श नागरिक बनला पाहिजे. त्यामुळे त्यांना शिक्षणाबरोबर परस्परांचा आदर, राष्ट्रीय अखंडता, निसर्ग रक्षण व योग्य आचरण या गोष्टींची जाणीवपूर्वक शिकवण दिली पाहिजे, असे मत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. इब्राहिम नदाफ यांनी व्यक्त केले.

येथील श्री श्री रविशंकर गुरुकुलच्या वतीने शनिवारी आयोजित आनंद मेळावा व वार्षिक बक्षीस वितरणप्रसंगी डॉ. नदाफ बोलत होते. डॉ. जितेंद्र कानडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य बबूराव चव्हाण, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष ॲड. दीपक आलुरे, सरपंच सरिता मोकाशे, ग्रामपंचायत सदस्य अलका बिराजदार, संस्थेचे सचिव डॉ. नागनाथ कुंभार, संचालक प्रशांत मिटकर यांची प्रमुख होती.

श्री. चव्हाण, ॲड. आलुरे, श्रीमती मोकाशे, अलका बिराजदार व डॉ. कानडे  यांची यावेळी भाषणे झाली. प्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल शाळेच्या वतीने डॉ. नदाफ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्यस्तरीय बॅडमिंटन, कुस्ती, कराटे व अन्य क्रीडा प्रकारांमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थी आयोजित आनंद बाजारात मुलांसह पालकांनी आनंद घेतला. 

मुख्याध्यापिका पुष्पा लामतुरे यांनी प्रास्तविक केले. शिवराज भुजबळ यांनी सूत्रसंचालन केले. मंजूषा जोशी यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक लक्ष्मण नरे, जयश्री नाटेकर, आबाई वाघमारे, नेहा पांचाळ, रामेश्वर सांवत, दादाराव घोडके, मार्तंड मोकाशे यांनी पुढाकार घेतला.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News