'या' जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घेतली कॅापी न करण्याची शपथ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020

रायगड जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून परीक्षेसाठी तयारी झाली असल्याची माहिती देण्यात आली. मंगळवारी ११ ते २ या वेळेत मराठी भाषेचा पहिला पेपर आहे. 

अलिबाग : महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा मंगळवार  पासून सुरू होत आहे. यासाठी रायगड जिल्ह्यात ७१ केंद्रांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील ४० हजार ३९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी कॉपी न करण्याची शपथ दिली जाणार आहे. त्याचबरोबर केंद्र परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 

रायगड जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून परीक्षेसाठी तयारी झाली असल्याची माहिती देण्यात आली. मंगळवारी ११ ते २ या वेळेत मराठी भाषेचा पहिला पेपर आहे. परीक्षेत कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सहा भरारी पथके तयार केली आहे. त्याचबरोबर छुपे कॅमेरे व अन्य संपर्क साधने विद्यार्थ्यांना व इतर कोणालाही परीक्षा केंद्रावर घेण्यास बंदी आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. एल. थोरात यांनी दिली.संवेदनशील केंद्रावर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी भेटी देणार आहेत. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News