विद्यार्थ्याचा विहिरीत मृतदेह सापडल्याने उडाली खळबळ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

नातेवाईकांसह गावकऱ्यांनी शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. त्यामुळे दीपक याच्या भावामार्फत परतूर पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती.

परतूर/सातोना : तालुक्यातील वरफळ येथील १६ वर्षीय बेपत्ता शाळकरी मुलाचा मृतदेह मंगळवारी विहिरीत आढळला. वरफळ येथील शाळेत इयत्ता १० वीच्या वर्गात शिकणारा दीपक मोकिंद खंडागळे हा विद्यार्थी शनिवारी  सकाळी  ७ वाजेच्या सुमारास घरी कोणाला काही न सांगता निघून गेला होता. 

नातेवाईकांसह गावकऱ्यांनी शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. त्यामुळे दीपक याच्या भावामार्फत परतूर पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. याबाबत तपास सुरू असताना  शनिवारी सकाळी गावातील शेतकरी ज्ञानेश्वर खरात यांच्या शेतातील विहिरीत दीपकचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी तात्काळ परतूर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलिस कर्मचारी श्री. चव्हाण, श्री. पाऊलबुद्धे व श्री. शिंदे दाखल झाले. गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News