शिक्षकांच्या आॅनलाईन बदली संदर्भात आयुष प्रसाद यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

अमरावती विभागाच्या पाच जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली संदर्भात सोमवारी अमरावती येथे शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, शिक्षण समिती सभापती तसेच आमदार, सर्व संघटना, पालक समिती, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक समिती, लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांच्या सूचना अभ्यासगटाने जाणून घेतल्या.

अकोला : जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेत बदल करण्याच्या शिफारशी संदर्भात जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी या विषयासाठी गठीत अभ्यास गट प्रमुख तथा पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिले. 

अमरावती विभागाच्या पाच जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदली संदर्भात सोमवारी अमरावती येथे शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, शिक्षण समिती सभापती तसेच आमदार, सर्व संघटना, पालक समिती, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक समिती, लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांच्या सूचना अभ्यासगटाने जाणून घेतल्या. अभ्यास गटाचे अध्यक्ष व सदस्यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी अकोला जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी बाजू मांडली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News