ऑलिंपिकची सुरूवात पूर्वनियोजित वेळेतच -किरण रिजिजू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

ही ऑलिंपिक स्पर्धा जुलै-ऑगस्टदरम्यान जपानच्या टोक्‍यो शहरात होणार आहे.

नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव होत असला आणि त्यामुळे सध्याच्या काही स्पर्धा रद्द कराव्या लागत असल्या तरी यंदाच्या वर्षात होणारी टोक्‍यो ऑलिंपिक नियोजित वेळेत होईल, असा विश्‍वास क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी व्यक्त केला. या विषाणूमुळे ऑलिंपिक स्पर्धा रद्द होण्याची भीती कालच प्रसिद्धी माध्यमांतून जाहीर करण्यात आली होती.

ही ऑलिंपिक स्पर्धा जुलै-ऑगस्टदरम्यान जपानच्या टोक्‍यो शहरात होणार आहे. मे महिन्यापर्यंत या घातक विषाणूवर मार्ग काढता आला नाही तर ऑलिंपिक स्पर्धा रद्द कराव्या लागतील, अशी भीती आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे वरिष्ठ सदस्य डिक पाँड यांनी कालच व्यक्त केली होती. हा विषाणू चीनमध्ये आहे. टोक्‍योत नाही, असे उत्तर रिजीजू यांनी दिले. या ऑलिंपिकसाठी जपानी संस्कृतीची भारतीय ॲथलीटने ओळख व्हावी यासाठी घेण्यात आलेल्या कार्यशाळेनंतर रिजीजू बोलत होते. सर्व देशांनी एकत्र येऊन या परिस्थितीचा सामना करायला हवा, असेही त्यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News