सोलापूरचा जयेश गिनेस बुक आॅफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये झळकला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 2 March 2020

मुंबई येथील टुलीप स्टार हॉटेल जुहू येथे २४ जानेवारी २०२० रोजी अमेझॉन प्राईम व्हिडिओ या यूट्यूब चॅनल माध्यमातून ‘द फॉरगॉटम आर्मी आझादी के लिए’ वेब सिरीजचे प्रमोशन करण्यात आले.

सोलापूर  : येथील जयेश सरवदे हा गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डमध्ये झळकला आहे. जयेशचे १२वी पर्यंतचे शिक्षण सोलापुरात झाले. सोलापुरात गिटारचे प्रशिक्षण घेऊन तो लोणावळा येथील सिंहगड कॉलेज येथे बी. ई. कॉम्पुटर सायन्सच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे.

सध्या त्याचे वय २२ आहे. शिक्षण घेत असतानाच त्याला गिटार वाजवण्याची आवड निर्माण झाली. त्यामुळे तो शिक्षण घेत गिटार वाजवतो. रोज कमीत कमी दोन तास आवर्जून गिटार वाजवतो. त्याने इच्छाशक्तीच्या बळावर यश मिळवले आहे. मुंबई येथील टुलीप स्टार हॉटेल जुहू येथे २४ जानेवारी २०२० रोजी अमेझॉन प्राईम व्हिडिओ या यूट्यूब चॅनल माध्यमातून ‘द फॉरगॉटम आर्मी आझादी के लिए’ वेब सिरीजचे प्रमोशन करण्यात आले. बॉलिवूडचे नामांकित म्युझिक डायरेक्‍टर प्रिन्स मुल्ला कार्यक्रमाचे आयोजक होते. 

कार्यक्रमास ‘द फॉरगॉटम आर्मी आझादी के लिए’ वेब सिरीजचे सर्व अभिनेते, कलाकार, अमेझॉन प्राईम व्हिडीओचे हेड, म्युझिक डायरेक्‍टर प्रीतम चक्रवर्ती व जगभरातून केनिया, दुबई, मलेशिया आदी देशातील रसिक प्रेक्षकांनी, मीडिया प्रतिनिधी यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी सिरीजचे ख्यातनाम म्युझिक डायरेक्‍टर प्रीतम चक्रवर्ती यांच्या गाण्यांचे समूह गायन करण्यात आले. त्यासाठी १०४६ गायकांची निवड करण्यात आली.

यापूर्वी ९५० गायकांची एकाच वेळी गायन करून गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला नोंद केलेली होती, परंतु आता ते रेकॉर्ड मोडून एकाचवेळी १०४६ गायकांनी एकत्र गायन करून नव्या जागतिक विक्रमाची नोंद केलेली आहे. गायकांत सोलापूर येथील गीतानगरातील लोटस अपार्टमेंट येथे राहणारा जयेश सरवदे याने सहभाग घेऊन गिटार वादक कलाकृती सादर केली आणि सोलापूरचे नाव गाजवले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News