शूटिंग बॅाल स्पर्धेत सोलापूरने मारली बाजी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 February 2020

वसई पश्‍चिम देवाळे येथे रंजन कला-क्रीडा मंडळाच्या वतीने मनीष स्मृती चषक राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

वसई : वसई पश्‍चिम देवाळे येथे रंजन कला-क्रीडा मंडळाच्या वतीने मनीष स्मृती चषक राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अत्यंत चुरशीच्या सामन्यात संजय भोसले प्रतिष्ठान, सोलापूर हा विजेता ठरला; तर शोएब जामनेर संघाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

शूटिंग बॉल स्पर्धेत राज्यातून एकूण ३४ संघांनी सहभाग घेतला होता. या प्रसंगी आंतरराष्ट्रीय क्रीडापट्टू अमन चौधरी, विजय चौधरी, महापौर प्रवीण शेट्टी, वसई विकास बॅंकेचे उपाध्यक्ष जगदीश राऊत, संचालक केवल वर्तक, बसीन कॅथॉलिक बॅंकेचे संचालक ओनील आल्मेडा, सुनील वर्तक, नगरसेवक मनीष वर्तक, प्राची कोलासो यांच्यासह क्रीडाप्रेमी उपस्थित होते. मालेगाव स्पोर्टस्‌ (तृतीय), नवी मुंबई महापालिका (चौथा), एम. बी. पी. टी. संघ, मुंबई (पाचवा), रायगड जिल्हा संघ (सहावा), सावर्डे, रत्नागिरी (सातवा), आरमार विक्रांत (आठवा) या संघांनी बाजी मारली; तर सर्वोत्तम अमीर काझी, उत्कृष्ट नेटमन सिद्धार्थ कांबळे, उत्कृष्ट शूटर शोएब शेख ठरले.

मुंबई शूटिंग बॉल असोसिएशनचे सचिव दीपक सावंत यांचे विशेष सहकार्य लाभले.विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक व पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेसाठी संतोष वर्तक, अभिजित चौधरी, राकेश चौधरी यांच्यासहकार्यकर्त्यांनी मेहनत घेत स्पर्धा यशस्वी केल्या.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News