'या' चित्रपटातून सोबिता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020

अभिनेत्री सोबिता धुलीपालाने ‘रमन राघव २.०’ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ती ‘कालाकांडी’, ‘शेफ’सारख्या चित्रपटांत; तर ‘घोस्ट स्टोरीज’ या वेबसीरिजमधून प्रेक्षकांसमोर आली.

अभिनेत्री सोबिता धुलीपालाने ‘रमन राघव २.०’ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ती ‘कालाकांडी’, ‘शेफ’सारख्या चित्रपटांत; तर ‘घोस्ट स्टोरीज’ या वेबसीरिजमधून प्रेक्षकांसमोर आली. आता लवकरच ती ‘मेजर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा तिचा पहिलाच तेलगू चित्रपट असणार आहे. या चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

हा चित्रपट २६/११ रोजी मुंबईतील ताज हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्यातील महत्त्वाची भूमिका बजावणारे रिअल लाईफ हिरो मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशी किरण-टिक्का यांचे असणार आहे. साऊथ अभिनेता महेशबाबू या चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. हा चित्रपट तेलगूसह हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News