विधी महाविद्यालयात सहावे राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

अधिवेशनात अकोला एज्युकेशन सोसायटीद्वारे महाविद्यालयात विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकलेल्या दोन विद्यार्थ्यांची प्रत्येकी पाच हजार रुपयांचे बक्षीस देवून गौरव करण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येईल.

अकोला : अकोला एज्युकेसन सोसायटीच्या शतकीय वाटचालीच्या निमित्ताने अकोला विधी महाविद्यालयाद्वारे शनिवार  सहावे राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या उद्‍घाटन समारंभासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांची विशेष उपस्थिती राहणार आहेत. 

या एकदिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचे मुख्य विषय ‘प्रगतीशील कायदे आणि कल्याणकारी राज्य’ या विषयावर ठेवण्यात आला आहे. या विषयाला अनुसरुन देशभरातील विधी प्राध्यापक, विधीज्ञ, संशोधक, विचारक व व्यक्तींकडून शोध-निबंध आमंत्रित करण्यात आले आहेत. या अधिवेशनाचे औचित्य साधून २०१९-२० वर्षात विधी अभ्यासक्रमात आचार्य पदवी मिळविणाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यासोबतच महाविद्यालयाच्या रिसर्चचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय अधिवेशनात सहभागी होण्याचे आवाहन मुख्य संयोजक डॉ.एस.सी.भंडारी, व संयोजिका डॉ.रत्ना चांडक यांनी केले आहे. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News