धक्कादायक ! फसवणूक करून तरूणीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

या घटनेनंतर पीडित महिलेलेने लोकल ठाणे गाठले. तेथून ती नाशिक येथे मामाकडे गेली आणि घडलेला प्रसंग कथन केला. त्यानंतर पीडित महिलेच्या नातेवाईकांनी कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली.

नवी मुंबई : रेल्वेस्थानकात सोडण्याच्या बहाण्याने तिघा नराधमांनी वाट चुकलेल्या १९ वर्षीय असहाय विवाहितेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी या घटनेतील तिघा नराधमांना २४ तासांच्या आत अटक केली. न्यायालयाने या तिन्ही आरोपींची २९ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती परिमंडळ-१चे पोलिस उपआयुक्त पंकज डहाणे यांनी दिली.  

या घटनेतील १९ वर्षीय पीडित महिलेचे दोन महिन्यांपूर्वी लग्न झाले असून ती पतीसह मुंब्रा परिसरात राहत होती. तसेच ती दारोदारी फिरून तूपविक्री करत होती. मंगळवारी ती पतीसह घाटकोपर येथे गेली असताना लोकल पकडताना तिची आणि पतीची चुकामूक झाली होती. दरम्यान, पीडित महिलेच्या पतीने कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पतीने दिली होती; तर दुसरीकडे पीडित महिलादेखील आपल्या पती आणि नातेवाईकांच्या शोधात रात्री उशिरा मुंब्रा रेल्वे स्टेशनवर पोहोचली. मात्र रात्र वाढल्यामुळे तिने स्थानकातच मुक्काम केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिवशी ती नातेवाईकांच्या शोधात दिवा रेल्वेस्थानकात पोहोचली. मात्र तिथेही तिला कुणी सापडले नाही.  

दरम्यान, पीडितेकडे खर्चास पैसे नसल्यामुळे तिने एका वृद्ध भिकारी महिलेकडे जवळचे सोन्याचे दागिने विकून पैसे मिळवून देण्याची विनंती केली. त्यानंतर वृद्ध भिकारी महिला पीडितेला महापे परिसरातील झोपडपट्टीत घेऊन गेली. मात्र तेथे दागिने विकणे अशक्‍य झाल्यामुळे पीडित महिला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एकटीच पायी चालत महापे परिसरातील साईसागर हॉटेल चौकात आली. त्यानंतर तिने एका रिक्षाचालकाला रेल्वेस्थानकात सोडण्याची विनंती केली.

पीडित महिला एकटी असल्याचे हेरून रिक्षाचालकाने तिला महापे येथील बसस्थानकाच्या पडीक इमारतीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच पीडितेजवळील सोने-चांदीचे दागिने काढून घेतले आणि महापे येथील राममंदिर परिसरात सोडून पलायन केले. त्यानंतर रात्री १० वाजण्याच्या सुमारास पीडितेला रेल्वेस्थानकात सोडतो, असे सांगत स्कूटरवर आलेल्या दोन तरुणांनी तिला स्कूटरवर घेऊन ठाणे-बेलापूर मार्गालगत नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. 

या घटनेनंतर पीडित महिलेलेने लोकल ठाणे गाठले. तेथून ती नाशिक येथे मामाकडे गेली आणि घडलेला प्रसंग कथन केला. त्यानंतर पीडित महिलेच्या नातेवाईकांनी कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल कपून गुन्हा रबाळे एमआयडीसी पोलिसांकडे पुढील तपासासाठी वर्ग केला. दरम्यान, रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गीते यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वेगवेगळी तपास पथके तयार केली.

पीडित महिलेने दिलेल्या तिन्ही आरोपी, रिक्षा, स्कूटर आणि घटनास्थळाच्या वर्णनावरून पोलिसांनी २४ तासांच्या आत तिघा आरोपींना अटक केली. तसेच या गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि स्कूटर जप्त केली. तसेच पीडितेचे लुटलेले दागिनेदेखील हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे)अनिल पाटील हे करीत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News