तिसऱ्या ‘सिंधी प्रीमियर लीग- २०२०’मध्ये शिवानंदा संघ विजयी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020

लीग पद्धतीने खेळल्या गेलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना बीएमएस विरुद्ध शिवानंदा यांच्यात झाला.शिवानंदा संघाने विजेतपदावर आपले नाव कोरले. विजेत्या संघास ३१ हजार, करंडक, तर उपविजेत्या संघास २१ हजार रुपये आणि करंडक देण्यात आला.

देवळाली कॅम्प : सिंधी पंचायत आयोजित तिसऱ्या ‘सिंधी प्रीमियर लीग- २०२०’मध्ये शिवानंदा संघाने बीएमएस संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. बालगटाचे विजेतेपद ज्योती संघाला हरवून बालाजी संघांनी जिंकले. या वेळी विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. येथील आनंद रोड मैदानावर सुरू असलेल्या तिसऱ्या एसपीएल स्पर्धेत वरिष्ठ गटात सहा, तर कनिष्ठ गटात तीन संघांना प्रवेश देण्यात आला.

लीग पद्धतीने खेळल्या गेलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना बीएमएस विरुद्ध शिवानंदा यांच्यात झाला.शिवानंदा संघाने विजेतपदावर आपले नाव कोरले. विजेत्या संघास ३१ हजार, करंडक, तर उपविजेत्या संघास २१ हजार रुपये आणि करंडक देण्यात आला. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार, उद्योजक नरेश कारडा, महाराज बिरमानी, बसंत गुरुनानी, आशा गोडसे, चंद्रकांत गोडस, नवीन गुरुनानी, प्रकाश केवळाणी, गोपाल कुकरेजा, घनश्‍याम महाराज, प्रकाश लाखवणी, हासनंद निहलानी आदी उपस्थित होते.

सिंधी भाषेचा प्रचार व प्रसार हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रमुख आयोजक व सिंधी पंचायत अध्यक्ष रतन चावला यांनी सांगितले. सिंधी महिलांसाठी घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन यंदा २५ एप्रिल २०२० पासून गुजर सुभाष हायस्कूलमध्ये खास महिलांसाठी क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धा यशस्वितेसाठी राजू नागदेव, मूलचंद आहुजा, हिरो रिजवानी, सुनील कटारिया, मनोहर माखिजा, सोनू हेमनानी, विजय कुकरेजा, अनिल सचदेव, जगदीश मानवानी, सुनील बालानी, जगदीश सचदेव,विकी खत्री, मोनिष रोहिरा, इशांत नंदवानी, भूषण रहेजा, दीपेश लखवाणी, नीरज नंदवानी आदींनी प्रयत्न केले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News