‘गोल सेट’ करा व त्यानंतर मेहनत करा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 2 March 2020

प्रा. नरेंद्र आरेकर यांनी त्यांच्या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे देऊन विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण केले. जीवनात आपला ‘गोल सेट’ करा व त्यानंतर मेहनत करून कुठल्याही परीक्षांना समोर जाता येईल, असे सुचविले. कठोर मेहनत, अवांतर वाचन, दैनंदिन घडामोडी, विज्ञान, तंत्रज्ञान तसेच वेळेचा सदुपयोग याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना अवगत केले.
 

 गडचिरोली : दहावी व बारावी हे आयुष्यातले महत्त्वाचे वर्षे असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीने अभ्यास करून आपले ध्येय गाठावे, असे आवाहन कुरखेडा येथील गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयाचे प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांनी केले.

‘सकाळ’ माध्यम समूह, आकार बहुउद्देशीय संस्था व पॅराडाईज ग्रुपच्या वतीने रविवारी  गडचिरोली येथील कात्रटवार सभागृहात आयोजित केलेल्या मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी आकार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संतोष बोलुवार, पॅराडाईज ग्रुपचे संचालक चंद्रधार उरकुडे, ‘सकाळ’चे जिल्हा बातमीदार सुरेश नगराळे, उपसंपादक मिलींद उमरे उपस्थित होते.

प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर पुढे म्हणाले की, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासोबतच आपले ध्येय ठरवून त्याचा पाठलाग केल्यास ते साध्य करण्यास अडचण जात नाही. अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनाची सवय लावली तर स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करता येईल. सध्या तरुणांना मोबाईलचे वेड लागले आहे. नको तेवढा वेळ ते त्यात घालत असतात. सेल्फीच्या नादात ते सेल्फी बनत चाले आहेत.

स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अंतरंग व बाह्यरंग समजून घेतलेपाहिजे, असे सांगून प्रा. आरेकर म्हणाले, मोबाईल हे अलिबाबाची गुहा आहे. त्यातून चांगल्या गोष्टी आत्मसात करून बौद्धिक विकास साधता येतो. परंतु आजचा तरुण चांगल्या गोष्टी सोडून नको त्या विषयावर आपला वेळ घालवत असल्याने पालक व समाजासाठी चिंतेचा विषय बनला आहे.

पालकांनी मुलांकडे ‘इन्व्हेस्टमेंट’ म्हणून न बघता त्यांना मुक्तपणे जगू दिले पाहिजे. त्यांच्या आवडी-निवडी विचारात घेऊनच शिक्षण दिल्यास फायद्याचे होईल. मात्र, विद्यार्थ्यांसमोर जिद्द, चिकाटी व ध्येय समोर नसेल तर काहीच साध्य करता येणार नाही, असे प्रा. आरेकर म्हणाले. 

प्रास्ताविकात संतोष बोलुवार यांनी ‘आकार’ संस्थेच्या कार्याची माहिती देऊन त्यांनी ‘सकाळ’च्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. 

कार्यक्रमाचे संचालन चेतन गोरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मिलिंद उमरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुपेश भंडारे, किशोर खेवले, पुष्पक भानगे तसेच ‘आकार’ संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

विद्यार्थ्यांनी उपस्थित केले प्रश्‍न

मार्गदर्शन कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी अभ्यासात येत असलेल्या अडचणी, समस्या व भीती याबाबत प्रश्‍न उपस्थित केले. यावेळी प्रा. नरेंद्र आरेकर यांनी त्यांच्या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे देऊन विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण केले. जीवनात आपला ‘गोल सेट’ करा व त्यानंतर मेहनत करून कुठल्याही परीक्षांना समोर जाता येईल, असे सुचविले. कठोर मेहनत, अवांतर वाचन, दैनंदिन घडामोडी, विज्ञान, तंत्रज्ञान तसेच वेळेचा सदुपयोग याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना अवगत केले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News