शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 23 January 2020

यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ बी. फार्मसी व कॉलेज ऑफ डी. फार्मसीच्यावतीने युफोरिया २०२० या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

सावंतवाडी : जीवनात यशस्वी करिअर घडवायचे असेल, तर शिस्तप्रिय जीवनशैली आवश्‍यक आहे. औषधनिर्माण क्षेत्रात नावीन्यपूर्ण संशोधन करून विद्यार्थ्यांनी संस्थेचे परिणामी सावंतवाडीचे नाव जगभरात उज्ज्वल करावे, असे आवाहन सावंतवाडी संस्थानचे राजे बाळराजे भोसले यांनी केले. यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ बी. फार्मसी व कॉलेज ऑफ डी. फार्मसीच्यावतीने युफोरिया २०२० या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी सावंतवाडी संस्थानच्या राणीसाहेब शुभदादेवी भोसले, संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ॲड. अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय समन्वयक सुनेत्रा फाटक, बी. फार्मसी प्राचार्य डॉ. विजय जगताप, डी. फार्मसी प्राचार्य तुषार रुकारी, पॉलिटेक्‍निक प्राचार्य गजानन भोसले, रजिस्ट्रार प्रसाद महाले, जनसंपर्क अधिकारी नितीन सांडये, विभागप्रमुख सत्यजित साठे उपस्थित होते.

शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. यामध्ये पहिले चार दिवस विविध स्पर्धा जसे डूडल स्केचिंग, व्हेजीटेबल कार्व्हिंग, क्‍यूब सॉल्विंग, कोलाज मेकिंग, फूड-गेम स्टॉल इत्यादी घेण्यात आल्या. यात व्हेजिटेबल कार्व्हिंगमध्ये पूजा सांगेलकर व मनाली पोकळे , प्रियांका शेडगे व नवनाथ पाटील , पूजा सावंत, अक्षता पाटील, साहिल घाडी व निवेदिता देवकर , डूडल स्केचिंगमध्ये संकेत गावडे, सायली माडखोलकर, अंकिता नाईक,कोलाज मेकिंगमध्ये मिताली नासरे, अक्षता ठाकूर, तृप्ती मेस्त्री , रिद्धी राणे, श्रद्धा गावडे, आफिया बेग, नेहा मयेकर, नेहा घाडीगावकर  यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

यावर्षी नव्याने घेण्यात आलेली क्‍यूब सॉल्विंग स्पर्धा सर्वांचे आकर्षण ठरली. यात हरीश म्हापसेकर याने अवघ्या ०.५५ सेकंदात क्‍यूब सॉल्व करत प्रथम क्रमांकासह प्रेक्षकांची मने जिंकली. याच स्पर्धेत रणजीत थावरे व मंगेश माने  विजयी झाले.

राणीसाहेब शुभदादेवी भोसले यांनी संस्था विद्यार्थ्यांसाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. अच्युत सावंतभोसले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन प्रा. नमिता भोसले यांनी तर यशस्वी आयोजन प्रा. प्रीती पटले, प्रा. नमिता नार्वेकर व प्रा. सुप्रिया राऊळ यांनी केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News