उनाडकटच्या सात विकेटच्या जोरावर सौराष्ट्र रणजीच्या अंतिम फेरीत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 March 2020

कर्णधार जयदेव उनाडकटच्या सात विकेटच्या जोरावर सौराष्ट्रने गुजरातचा ९२ धावांनी पराभव करून रणजी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

राजकोट : कर्णधार जयदेव उनाडकटच्या सात विकेटच्या जोरावर सौराष्ट्रने गुजरातचा ९२ धावांनी पराभव करून रणजी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ९ मार्चपासून सुरू होणाऱ्या विजेतेपदाच्या लढतीत त्यांचा सामना बंगालशी होणार आहे.

माजी विजेत्या गुजरातला विजयासाठी ३२७ धावांचे आव्हान देण्यात आले होते, परंतु आजच्या अखेरच्या दिवशी त्यांचा डाव २३४ धावांवर संपुष्टात आला. गुजरातची अवस्था ५ बाद ६३ अशी झाली होती. त्यानंतर कर्णधार पार्थिव पटेल (९३), चिराग गांधी (९६) यांनी १५८ धावांची भागीदारी करून सामन्यात रंग भरले होते. जम बसलेल्या या दोन्ही फलंदाजांना उनाडकटने बाद केले आणि सौराष्ट्रचा विजय सुकर केला. न्यूझीलंड दौऱ्यावरून भारतीय संघ परतत असल्याने चेतेश्‍वर पुजारा अंतिम सामन्यासाठी उपलब्ध होईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News