सुलाफेस्टमध्ये 'सलीम-सुलेमानचा' दमदार परफॉर्मन्स

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Monday, 3 February 2020

नाशिक : ‘कुरबां हुआ’, ‘ए खुदा मुझको बता’ अशी लोकप्रिय गाणी सादर करत सलीम-सुलेमान जोडी आणि त्यांच्या सहकलावंतांनी वातावरणातील गारव्यात जोश भरला. सलीम-सुलेमानच्या जोडीने सुलाफेस्ट-२०२० च्या व्यासपीठावर आगामी अल्बम ‘भूमी-२०२०’चे गीत ‘जिनी जिनी’सोबत अन्य गाणी सादर करताना संगीतप्रेमींना मनसोक्त थिरकविले. सुलेमानने ‘झेनड्रम’ या अनोख्या वाद्याद्वारे सादरीकरण करत लक्ष वेधले. या सादरीकरणातून जोडीने संगीतप्रेमींच्या हृदयाची तार छेडली. रविवारी सुला विनियार्डसच्या प्रांगणात झालेला सुलाफेस्ट-२०२० चा दुसरा दिवस भारतीय कलावंतांनी गाजविला.

नाशिक : ‘कुरबां हुआ’, ‘ए खुदा मुझको बता’ अशी लोकप्रिय गाणी सादर करत सलीम-सुलेमान जोडी आणि त्यांच्या सहकलावंतांनी वातावरणातील गारव्यात जोश भरला. सलीम-सुलेमानच्या जोडीने सुलाफेस्ट-२०२० च्या व्यासपीठावर आगामी अल्बम ‘भूमी-२०२०’चे गीत ‘जिनी जिनी’सोबत अन्य गाणी सादर करताना संगीतप्रेमींना मनसोक्त थिरकविले. सुलेमानने ‘झेनड्रम’ या अनोख्या वाद्याद्वारे सादरीकरण करत लक्ष वेधले. या सादरीकरणातून जोडीने संगीतप्रेमींच्या हृदयाची तार छेडली. रविवारी सुला विनियार्डसच्या प्रांगणात झालेला सुलाफेस्ट-२०२० चा दुसरा दिवस भारतीय कलावंतांनी गाजविला.

सलीम-सुलेमानच्या सादरीकरणाचा उत्साह उत्तरोत्तर वाढत गेला, तर ‘चक दे इंडिया’ या गाण्याने समारोप करताना तिरंगा फडकवत, ‘भारतमाता की जय’च्या घोषाने सुलाफेस्ट-२०२० चा समारोप झाला. ‘सुलाफेस्ट’च्या यंदाच्या तेराव्या हंगामात सहभागी होत देशविदेशातील संगीतप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यानिमित्त साकारलेल्या  ‘विनोस्फिअर’मध्ये वेळ घालविताना विविध उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवत रसिकांनी आनंद लुटला. परिसरात असलेल्या बझारमध्ये खरेदीसाठीही लक्षणीय गर्दी झाली होती.

आजच्या दुसऱ्या दिवशी ॲम्फिथिएटर प्रांगणात ग्रीसच्या माइक अकिडा या बॅंडच्या सादरीकरणाने सुरवात झाली. यानंतर भारतीय बॅंड ‘वोस्ट्रॉनिका’तर्फे दमदार सादरीकरण करण्यात आले. तिसरे सादरीकरण झाले ते ‘इलेक्‍ट्रोफाझ’ या फ्रान्सच्या बॅंडचे. सूर्य मावळताना रम्य सायंकाळच्या वातावरणात निर्माण झालेल्या गारव्यात भारतीय बॅंड ‘द लोकल ट्रेन’च्या माध्यमातून ऊर्जा भरण्यात आली, तर नेदरलॅंडमधील ‘माय बेबी’ बॅंडच्या आंतरराष्ट्रीय कलावंतांनीही आपल्या शैलीतील संगीतरचना सादर करत उपस्थितांना मनसोक्‍त नाचण्याची संधी उपलब्ध करून दिली, तर साडेआठच्या सुमारास संगीतप्रेमींनी पुन्हा एकदा ॲम्फिथिएटर परिसरात गर्दी करण्यास सुरवात केली. सलीम-सुलेमान यांच्यासह कलावंतांचे आगमन होताच एकच जल्लोष करत संगीतप्रेमींनी त्यांचे स्वागत केले, तर प्रत्येक गाण्याच्या सादरीकरणासोबत सहभागी तरुणाईने धमाल करत मनसोक्‍त थिरकण्याचा आनंद घेतला.  

‘वोस्ट्रॉनिका’ला उत्स्फूर्त दाद

कुठलेही वाद्य हाती घेतलेले नसताना, अगदी सवाद्य सादरीकरण वाटावे असा अनोखा आविष्कार ‘वोस्ट्रॉनिका’च्या सदरीकरणात अनुभवायला मिळाला. नावाजलेल्या हिंदी गीतांच्या जोडीला अस्सल मराठमोळी गाणी सादर करताना जगभरातून आलेल्या संगीतप्रेमींचे लक्ष वेधले. अनेकांनी तर डोळे मिटत, व्यसपीठाकडे पाठ करत कुठल्याही वाद्याशिवाय सादर होत असलेल्या या संगीताचा थरार अनुभवला.

पर्यावरण संवर्धनाचा महोत्सवातून संदेश

एकीकडे महोत्सवातून संगीताची जादू विखुरण्यासह दुसरीकडे पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश कृतीतून देण्यात आला. यूएस पोलो असोसिएशनमार्फत महोत्सवाच्या ठिकाणी प्लॅस्टिक बॉटल विघटनासाठी विशिष्ट मशिन बसविण्यात आले होते. त्यामुळे पाण्याच्या प्लॅस्टिक बॉटल्सचा प्रभावी उपयोग झाला. यंदा डिजिटल माध्यमातून व्यवहार करण्यात आल्याने कागदाचा वापरही टाळण्यात आला. तसेच सहभागींइतक्‍या रोपट्यांची लागवड केली जाणार असल्याने या माध्यमातूनदेखील पर्यावरण जोपासले जाणार आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News