'या' चित्रपटातून सई ताम्हणकर प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 March 2020

मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते. मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर सई हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते. मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर सई हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवत आहे.

ती ‘हंटर’ आणि ‘लव्ह सोनिया’ या हिंदी चित्रपटात झळकली होती. यामधून तिने हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता लवकरच ती बॉलीवूड अभिनेत्री क्रीती सेननची मुख्य भूमिका असलेल्या ‘मिमी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रीकरणादरम्यान सईच्या पायाला मार लागला तरीही तिने चित्रपटाचे चित्रीकरण न थांबवता केले आहे. ‘जेव्हा माझा पाय फ्रॅक्‍चर आहे हे मला कळलं तेव्हा खरं तर मी खूप घाबरले होते.

सगळ्यात आधी मला माझ्या चित्रपटाच्या चित्रीकरणाची चिंता होती. परंतु मी चित्रीकरण थांबवले नाही. ते फ्रॅक्‍चर घेऊन मी माझे सिन्स पूर्ण करत आहे. या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने मला खूप आधार दिला,’ असे सई सांगते

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News