सई मांजरेकरला पुन्हा लाभली सलमानची साथ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 19 March 2020
  • ‘दबंग ३’ चित्रपटामधून महेश मांजरेकर यांची लेक सईने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.
  • बॉलीवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करू इच्छिणारी सई आता एका म्युझिक व्हिडीओमधून प्रेक्षकांसमोर आली आहे.

‘दबंग ३’ चित्रपटामधून महेश मांजरेकर यांची लेक सईने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलीवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करू इच्छिणारी सई आता एका म्युझिक व्हिडीओमधून प्रेक्षकांसमोर आली आहे. यासाठी पुन्हा एकदा तिला सलमानची साथ लाभली आहे.

सईचा ‘मांझा’ हा म्युझिक व्हिडीओ सलमानने शेअर केला आहे. यामध्ये सईला आयुष शर्माची साथ लाभली आहे. सई-आयुषचा या गाण्यातील रोमॅण्टीक अंदाज पाहण्याजोगे आहे. सलमानने आपल्या बहिणीचा पती आयुषला बॉलीवूडमध्ये लाँच केलं. शिवाय पदार्पणातच सईलाही सल्लुमियाँबरोबर काम करण्याची संधी मिळाली. हे गाणं प्रदर्शित होताच ‘मांझा’ला सलमानने दाद दिली आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News