साध्वी धुरीला सर्वाेत्कृष्ट जलतरणपटूचा मान

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 February 2020

पहिल्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत जलतरण क्रीडा प्रकारात साध्वी धुरीला सर्वोत्कृष्ट जलतरणपटू म्हणून गौरविण्यात आले.

भुवनेश्‍वर : पहिल्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत जलतरण क्रीडा प्रकारात साध्वी धुरीला सर्वोत्कृष्ट जलतरणपटू म्हणून गौरविण्यात आले.

साध्वी ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची खेळाडू असून, या स्पर्धेत तिने ५०, १०० आणि २०० मीटर फ्री स्टाइलसह २०० मीटर वैयक्तिक मिडले, १०० मीटर बटरफ्लाय या सर्व प्रकारांत सुवर्णपदक; तर बटरफ्लायमध्ये रौप्यपदक मिळविताना सर्वोत्कृष्ट जलतरणपटूचा मान मिळविला. याशिवाय मुलांमध्ये मिहीर आंब्रेने ५० व १०० मीटर बटरफ्लाय, ५० मीटर फ्री स्टाइल या प्रकारांत सुवर्णपदक पटकावले होते.

या स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अव्वल स्थान कायम राखले. यात मुलांनी ३ सुवर्ण, २ रौप्य व ५ ब्राँझपदके आणि मुलींनी  ६ सुवर्ण व प्रत्येकी १ रौप्य व  ब्राँझ अशी एकूण १८ पदके मिळविली आहेत. तर दुसऱ्या स्थानावर जैन विद्यापीठ कर्नाटक, तर तिसऱ्या स्थावर पंजाब विद्यापीठ पंजाब आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News