रसेल दिब्रिटो ठरला 'मुंबई श्री'चा मानकरी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 2 March 2020

अंधेरीच्या सेलिब्रेशन स्पोर्टस्‌ क्‍लबच्या मैदानातील मुंबई श्री स्पर्धा १२ गटांत झाली. त्यात भास्कर कांबळे, नीलेश दगडे, सुशील मुरकर हे प्रबळ दावेदार होते, पण अंतिम टप्प्यात जजेसनी सुशील मुरकर, नीलेश दगडेसह रसल दिब्रिटोची निवड केली.

मुंबई : आयटी इंजिनीयर असलेल्या तसेच अवघ्या सात महिन्यांत अव्वल शरीरसौष्ठव होण्याचे स्वप्न बाळगलेल्या रसेल दिब्रिटोने मुंबई श्री किताब पटकावला. अमला ब्रह्मचारीने ‘मिस मुंबई’चा मान मिळवला; तर फिजिक स्पोर्टस्‌ प्रकारात रेणुका मुदलियार तसेच अरमान अन्सारी, आतिक खानने बाजी मारली.

अंधेरीच्या सेलिब्रेशन स्पोर्टस्‌ क्‍लबच्या मैदानातील मुंबई श्री स्पर्धा १२ गटांत झाली. त्यात भास्कर कांबळे, नीलेश दगडे, सुशील मुरकर हे प्रबळ दावेदार होते, पण अंतिम टप्प्यात जजेसनी सुशील मुरकर, नीलेश दगडेसह रसल दिब्रिटोची निवड केली. रसलच्या नागाच्या फण्यासारख्या पाठीने जजेसची मनेही जिंकली. ही त्याची पहिलीच स्पर्धा होती. मार्गदर्शक संजय चव्हाण यांच्या सूचनेनुसार सर्व काही करतो, हे त्यांचेच यश आहे असे तो म्हणाला. 

नऊ वर्षे हवाई सुंदरी असलेल्या रेणुका मुदलियारने दीपाली ओगले आणि मंजिरी भावसारला अनपेक्षित धक्का दिला. स्पर्धा संपल्यानंतर पहाटे ३ च्या असलेल्या विमानावर काम करण्यासाठी रेणुका लगेच निघालीही होती. गृहिणी अमला मुदलियार यांनी बाजी मारत सर्वांना धक्का दिला.

स्पर्धा निकाल-

५५ किलो : १) नीलेश कोळेकर (परब फिटनेस), २) नितीन शिगवण, ३) ओंकार आंबोकर. ६० किलो ः १) देवचंद गावडे (परब फिटनेस), २) प्रीतेश गमरे, ३) विराज लाड.

६५ किलो : १) उमेश गुप्ता (क्रिएटर जिम), २) तेजस भालेकर, ३) शैलेश गायकवाड. ७० किलो ः १) मनोज मोरे (बालमित्र जिम), २) आशिष लोखंडे, ३) राहुल तर्फे. ७५ किलो ः १) भास्कर कांबळे (ग्रेस जिम), २) सुजित महापात्रा, ३) अर्जुन कुंचीकोरवे.

८० किलो : १) सुशील मुरकर (वीर सावरकर जिम), २) सुशांत रांजणकर, ३) गणेश पेडामकर. ८५ किलो ः १) दीपक तांबिटकर (फॉर्च्युन फिटनेस), २) नितांत कोळी, ३) कुमार पेडणेकर.

९० किलो : १) रसल दिब्रिटो (बॉडी वर्कशॉप), २) अरुण नेवरेकर, ३) उबेग रियाज पटेल. ९० किलोवरील ः १) नीलेश दगडे (परब फिटनेस), २) प्रसाद वालांत, ३) येशूप्रभू तलारी.

फिजिक स्पोर्टस्‌ महिला : १) रेणुका मुदलियार (फॉर्च्युन फिटनेस), २) दीपाली ओगले, ३. डॉ. मंजिरी भावसार. महिला शरीरसौष्ठव ः १) अमला ब्रह्मचारी (फिटनेस वेअर हाऊस), २) डॉ. माया राठोड, ३) श्रद्धा ढोके.

पुरुष फिजिक स्पोर्टस्‌, १७० सेंमी) : १) अरमान अन्सारी (मॉर्डन फिटनेस), २) महेश गावडे, ३) अविनाश जाधव. १७० सेंमीपेक्षा जास्त : १) अतिक खान (फोर्ज फिटनेस), २) अली अब्बास, ३) प्रसाद तोडणकर. प्रगतिकारक शरीरसौष्ठवपटू : नीलेश दगडे (परब फिटनेस), उत्कृष्ट पोझर : अभिषेक खेडेकर (पंपिंग आर्यन).
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News