‘कोरोना’चा धोका हा क्रिकेट रद्द होण्यापेक्षा मोठा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 20 March 2020
  • ‘कोरोना’चा धोका हा क्रिकेट रद्द होण्यापेक्षा मोठा आहे, त्यामुळे गांभीर्याने त्याचा सामना करायला हवा.

मेलबर्न : ‘कोरोना’चा धोका हा क्रिकेट रद्द होण्यापेक्षा मोठा आहे, त्यामुळे गांभीर्याने त्याचा सामना करायला हवा. या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी क्रिकेट पूर्णपणे ठप्प करण्यात आल्याचे समर्थन करताना ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टिम पेनने व्यक्त केली.

कोरोनाच्या या विषाणूचा जगभरात फैलाव सुरू झालेला आहे. त्यामुळे क्रिकेटविश्‍वात सध्या क्रिकेटबाबत एकही घडामोड घडणे बंद झाली आहे. क्रिकेटपटूंसाठी मैदानाबाहेर रहाणे कठीण जात असेल, पण आपण सर्वांनी मिळून ब्रेक घेण्याची ही वेळ आहे. सर्व महत्त्वाच्या स्पर्धा- मालिका एकापाठोपाठ होणार असल्या तरी क्रिकेटपेक्षा हा विषाणू धोकादायक आहे, परिणामी काळजी घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे पेनने ट्विटवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हटले आहे.

क्रिकेट हेच आपले जीवन आहे, लवकरात लवकर मैदानात उतरण्यासाठी आपण सर्व जण उत्सुक असलो तरी सध्या धीराने वागायला हवे, सर्वांनी मिळून या संकटाचा सामना करू या, असे पेनने म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियातील न्यूझीलंड तीन एकदिवसीय मालिका रद्द करण्यात आली. याच न्यूझीलंडविरुद्ध ते तीन ट्‌वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहेत, तीसुद्धा पुढे ढकलण्यात आली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News