सायकल रायडींग करत त्यांनी दिला फिटनेस आणि फ्रीडमचा संदेश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020

नांदेडकरांना सायकलच्या उपयुक्त व्यायामाची आवड निर्माण व्हावी, यासाठी ‘सकाळ’तर्फे ३५ किलोमीटर अंतराची सायकल राईड आयोजित करण्यात आली. या राईडमध्ये युवा, ज्येष्ठ नागरिकांबरोबरच शालेय व
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या राईडमध्ये गुणवंत खेळाडूंनीही सहभाग घेतला होता.

नांदेड : ‘सकाळ’च्या नांदेड आवृत्तीच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘फन, फिटनेस अँड फ्रीडम सायकल राईड’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी
पारितोषिक वितरण कार्यक्रमात साईनाथ सोनसळे, अंजना शिंदे आणि आझीम पंजवाणी यांना सम्मानित करण्यात आले.‘ट्रॅक अँड ट्रायल’ सायकलच्या विवेक सायकल स्टोअरतर्फे प्रायोजित फन,  फिटनेस अँड फ्रीडम सायकल राईडचे आयोजन करण्यात आले होते. नांदेडकरांना सायकलच्या उपयुक्त व्यायामाची आवड निर्माण व्हावी, यासाठी ‘सकाळ’तर्फे ३५ किलोमीटर अंतराची सायकल राईड आयोजित करण्यात आली. या राईडमध्ये युवा, ज्येष्ठ नागरिकांबरोबरच शालेय व
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या राईडमध्ये गुणवंत खेळाडूंनीही सहभाग घेतला होता.

पारितोषिक वितरण सोहळ्यात नांदेड सायकलिस्ट क्लबचे आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट अझीम पंजवानी ज्यांनी अमेरिका क्रास सायकलिंग मोहिमेत मार्शलची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पडली. नांदेडचा आणि देशाचा नावलौकिक केला. नांदेड पोलिस विभागाचे कर्मचारी साईनाथ सोनसळे तसेच अंजना शिंदे यांनी राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करून नांदेडचा तसेच पोलिस विभागाचा नावलौकिक केला. या तिन्ही गुणवंत खेळाडूंचा वजिराबाद येथे झालेल्या समारोप कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात
आला. 

या प्रसंगी ‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीचे निवासी संपादक दयानंद माने, नांदेड सायकल क्लबचे अध्यक्ष डॉ. देवेंद्रसिंह पालीवाल, नांदेड क्लबचे सचिव डॉ. लक्ष्मीकांत बजाज, जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटणी, ट्रॅक अँड ट्रायलचे संचालक विवेक सावरगावकर, जिल्हा हौशी सायकल असोसिएशनचे बंटी सोनसळे, संतोष सोनसळे, मुजीब खान, प्रवीण गायकवाड, डॉ. सुधाकर मिसाळे, इकबाल सिद्दिकी, क्रीडा बातमीदार प्रा. इम्तियाज खान आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News