रिया मेक्कट्टुकुलूमने पटकावला 'मिस नवी मुंबईचा' किताब

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020

मिस नवी मुंबईच्या नवव्या पर्वाचा अंतिम सोहळा वाशी येथील सिडकोच्या सभागृहात मोठ्या थाटात झाला.

वाशी : सौंदर्य स्पर्धांमध्ये महत्त्वाची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई मिसचा मुकुट रिया मेक्कट्टुकुलूम हिने पटकावला. वाशी येथील सिडकोच्या सभागृहात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या वेळी १६ सौंदर्यवतींनी आपल्या दिलखेच अदांनी परीक्षक व प्रेक्षकांना घायाळ करून टाकले. या वेळी दुसऱ्या व तिसऱ्या जागेवर अनुक्रमे निमिषा पराशर व प्रकृती राव यांनी बाजी मारली.

मिस नवी मुंबईच्या नवव्या पर्वाचा अंतिम सोहळा वाशी येथील सिडकोच्या सभागृहात मोठ्या थाटात झाला. परीक्षक म्हणून मिस दिवा सुपर नॅशनल शेफाली सूद, मॉडेल व अभिनेता जितेश निकम, डॉ. हनी, संजीव कुमार, अशोक मेहरा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.या स्पर्धेचे हे नववे पर्व असून या वर्षी शेकडो मुलींनी प्राथमिक फेरीत सहभाग नोंदवला.

यापैकी सर्वच फेरींमध्ये उत्कृष्ट ठरलेल्या फक्त १६ सौंदर्यवतींना अंतिम फेरीत प्रवेश मिळाला. या माध्यमातून आम्ही सामान्य घरांतील मुलींना एक व्यासपीठ निर्माण करून देत आहोत. म्हणूनच मनोरंजन व फॅशन क्षेत्रात आमचे स्पर्धक यापूर्वी चमकलेत आणि या स्पर्धेतील सौंदर्यवती आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छाप सोडत आहेत, अशी माहिती आयोजक यू अँड आय एण्टरटेन्मेंटचे हरमीत सिंग यांनी दिली.मनमित सिंग यांच्या संन्यास या बॅंडने आपल्या गाण्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. विशेष म्हणजे याच स्पर्धेची एक स्पर्धक सुमन राव जी मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड आशियाची विजेती आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News