'या' महाविद्यालयांची पुनर्तपासणी लवकरच

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 18 March 2020
  • अधिकाऱ्यांनी महाविद्यालयांची केलेली ‘गोपनीय’ पाहणी आणि त्यांच्या अहवालाबाबत संशय व्यक्त केला जात असल्याने या महाविद्यालयांची त्रयस्थ अधिकाऱ्यांमार्फत पुन्हा पाहणी केली जाणार आहे.

पुणे : शैक्षणिक सुविधांचा अभाव ठेवत नियमभंग करून वर्ग चालविणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी होऊनही शिक्षण विभागाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. अधिकाऱ्यांनी महाविद्यालयांची केलेली ‘गोपनीय’ पाहणी आणि त्यांच्या अहवालाबाबत संशय व्यक्त केला जात असल्याने या महाविद्यालयांची त्रयस्थ अधिकाऱ्यांमार्फत पुन्हा पाहणी केली जाणार आहे.

कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यासाठी पुरेशी जागा नसणे, बायोमेट्रिक हजेरी नसणे यांसारख्या त्रुटी ठेवून वर्ग सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिक्षण आयुक्तांनी या कनिष्ठ महाविद्यालयांच्या तपासणीचा आदेश दिला होता. उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात आली.

त्यात अनेक गैरप्रकार आढळले आहेत; परंतु अद्याप या शाळांना ना शिक्षणाधिकाऱ्यांनी कारवाई, ना आयुक्तांनी त्याची दखल घेतली आहे. एखाद्या सदनिकेमध्ये तीन हजार चौरस फूट जागेत कनिष्ठ महाविद्यालय चालविणे, विद्यार्थ्यांना बसायला पुरेशी जागा नसणे, शैक्षणिक पायाभूत सुविधा नसणे, प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी यंत्रणा नसणे.

वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती नसणे यांसारख्या अनेक बाबी या पाहणीत आढळल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले; पण त्याची दखल शिक्षणाधिकारी स्तरावरून घेतली जात नाही. अशा अधिकाऱ्यांवरही कारवाईचे सूतोवाच शिक्षण आयुक्तांनी केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News