रजनीकांत नंतर बॅालीवूडचा 'हा' कलाकार बनणार मॅन वर्सेस वाइल्ड चा भाग

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 30 January 2020
  • साउथचे सुपरस्टार रंजनीकांत नंतर आता बॅालीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार बेयर ग्रिल्स सोबत 'मैन वर्सेस वाइल्ड' या फेमस टिव्ही शोमध्ये दिसणार आहे.
  • वृत्तसंस्थेच्या एएनआयच्या माहितीनुसार अक्षय शोच्या शुटिंगसाठी मैसुरला पोहचला आहे.

साउथचे सुपरस्टार रंजनीकांत नंतर आता बॅालीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार बेयर ग्रिल्स सोबत 'मैन वर्सेस वाइल्ड' या फेमस टिव्ही शोमध्ये दिसणार आहे. वृत्तसंस्थेच्या एएनआयच्या माहितीनुसार अक्षय शोच्या शुटिंगसाठी मैसुरला पोहचला आहे. आणि इथल्या विमानतळावरून अक्षयचे फोटो ही समोर आले आहेत.  30 जानेवारीला अक्षय बेयर ग्रिल्ससोबत पहील शुटींग करणार आहे. बेयर ग्रिल्स अक्षय सोबत बांदीपुर टाइगर रिजर्व मध्ये शुट करण्यासाठी योग्य जागा शोधत आहेत, आणि तिथे दोघे जवळजवळ सहा तास शुटिंग करणार आहेत.

अक्षय कुमार आणि रजनीकांतच्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी मैन वर्सेस वाइल्ड' शोचा एक भाग प्रदर्शित झाला आहे. 'मैन वर्सेस वाइल्ड' डिस्कवरी चैनल मध्ये प्रसारित होणार आहे. 'मैन वर्सेस वाइल्डच्या शुटिंग दरम्यान रजनीकांत जखमी झाल्याची बातमी आली होती. पण अस काहीही झाले नव्हते,  असे रिजर्व डायरेक्टर टी बालाचंद्रा यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, रजनीकांत जखमी झाल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या, लोक खोट बोलत आहेत.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News