आता राजस्थान रॉयल्सला मिळणार नवीन होम ग्राउंड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

स्टीव स्मिथ नेतृत्व करणार असलेल्या राजस्थानचे उर्वरित होम सामने जयपूरमधील त्यांच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होतील.

नवी दिल्ली :  यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे गुवाहाटी हे दुसरे होम ग्राऊंड असणार आहे. बरसापाला स्टेडियमवर त्यांचे दोन सामने होणार आहेत.

५ आणि ९ एप्रिल रोजी अनुक्रमे दिल्ली आणि कोलकाताविरुद्धचे सामने या स्टेडियमवर होतील, असे बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आले आहे. स्टीव स्मिथ नेतृत्व करणार असलेल्या राजस्थानचे उर्वरित होम सामने जयपूरमधील त्यांच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होतील. त्यांचा सलामीचा सामना २ एप्रिल रोजी धोनीच्या चेन्नईविरुद्ध होणार आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News