ॲप्टिट्यूडची तयारी करताय? मग हे वाचा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 6 March 2020

ॲप्टिट्यूडची परीक्षा म्हणजे खऱ्या अर्थाने ‘Race Against Time’ आहे, कारण कमी वेळेत विद्यार्थ्यांना जास्त प्रश्‍न सोडवायचे असतात. काही विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेताना चांगले मार्क्स मिळवतात, मात्र ॲप्टिट्यूडच्या तयारीकडे दुर्लक्ष करतात.

पदवीचे शिक्षण घेण्याचा महत्त्वाचा उद्देशच नोकरी मिळविणे, हा असतो. नोकरी मिळविण्यासाठी ३ ते ४ वर्षांत शिकलेल्या ३० ते ४० विषयांच्या मार्क्सबरोबरच त्याने केलेल्या ॲप्टिट्यूडची तयारीही महत्त्वाची असते.

कंपन्या लाखो पात्र विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊ शकत नाहीत, त्यामुळे उपलब्ध विद्यार्थ्यांमधून पुढील टप्प्यात ठराविक चांगले विद्यार्थी नेण्यासाठी कंपन्या ॲप्टिट्यूड परीक्षेचा वापर करतात. विद्यार्थ्यांची समस्या सोडविण्याची क्षमता किती, हे तपासण्यात ॲप्टिट्यूडची परीक्षा महत्त्वाची भूमिका बजावते.

ॲप्टिट्यूडची परीक्षा म्हणजे खऱ्या अर्थाने ‘Race Against Time’ आहे, कारण कमी वेळेत विद्यार्थ्यांना जास्त प्रश्‍न सोडवायचे असतात. काही विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेताना चांगले मार्क्स मिळवतात, मात्र ॲप्टिट्यूडच्या तयारीकडे दुर्लक्ष करतात. अशा विद्यार्थ्यांनी वेळीच सावध होऊन ॲप्टिट्यूडच्या तयारीला इतर विषयांच्या अभ्यासाप्रमाणेच महत्त्व द्यायला हवे. उदा. ८० ते ८५ टक्के गुण मिळविणारे काही विद्यार्थी ॲप्टिट्यूडचा कमी सराव केल्यामुळे उत्तीर्ण होत नाहीत. जेमतेम ६० ते ६५ टक्के मिळविलेले काही विद्यार्थी ॲप्टिट्यूडचा खूप सराव केल्यामुळे नोकरी मिळवितात.

ॲप्टिट्यूडचा चांगला अभ्यास केल्यास मेगाभरती करणाऱ्या IT Service क्षेत्रातील २-३ कंपन्यांत बऱ्याचशा महाविद्यालयांतील एकूण पात्र विद्यार्थ्यांपैकी सुमारे ४० ते  ५० टक्के विद्यार्थी सहजतेने नोकरी मिळवतात. या कंपन्यांनी एकदा विद्यार्थ्याला संधी दिल्यानंतर अनुत्तीर्ण झाल्यास पुढची सहा महिने वा एक वर्ष पुन्हा त्या कंपनीची परीक्षा देता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्वांत प्रथम येणाऱ्या २ ते ३ मेगाभरती कंपन्यांची परीक्षा कुठल्याही परिस्थितीत प्रचंड मेहनत करून उत्तीर्ण व्हायलाच हवी. विद्यार्थी वेळेवर जागृत न झाल्यास IT  Service कंपन्यांत प्लेसमेंट झाली नाही, तर IT Product  किंवा Core कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी त्याला प्रचंड मेहनत करावी लागते.

घरची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण असणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांनी अंतिम वर्षाला जाण्यापूर्वीच ॲप्टिट्यूडची तयारी पूर्ण करावी.ॲप्टिट्यूडच्या परीक्षेमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांसाठी प्रश्‍नांची संख्या व त्यासाठी दिला जाणारा वेळ वेगवेगळे असतात. उदा.  काही मेगाभरती करणाऱ्या कंपन्या ४० मिनिटांत ३० प्रश्‍न वा ६० मिनिटांत ५० प्रश्‍न किंवा ९५ मिनिटांत ६५ प्रश्‍न सोडवायचे असतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News