वकिलांच्या क्रिकेट स्पर्धेत पोलिस संघ प्रथम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 18 March 2020
  • अंतिम सामन्यात या संघाने ॲड. विल्यम फर्नांडिस यांच्या संघावर तब्बल १० गडी राखून मात केली.
  • पोलिस संघाचे अष्टपैलू खेळाडू सागर खांडेकर आणि न्यायाधीश संघाचे न्या. देशपांडे यांच्या मैदानावरील कामगिरीमुळे अंतिम फेरीतील सामने संस्मरणीय ठरले.

विरार : वसईत झालेल्या वकील, न्यायाधीश, पोलिस आणि कोर्ट कर्मचारी यांच्या क्रिकेट स्पर्धेत पोलिस संघाने विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात या संघाने ॲड. विल्यम फर्नांडिस यांच्या संघावर तब्बल १० गडी राखून मात केली. पोलिस संघाचे अष्टपैलू खेळाडू सागर खांडेकर आणि न्यायाधीश संघाचे न्या. देशपांडे यांच्या मैदानावरील कामगिरीमुळे अंतिम फेरीतील सामने संस्मरणीय ठरले.

महिलांच्या स्पर्धेत अंतिम सामन्यात ॲड. दर्शना त्रिपाठी यांच्या पिंक पॅंथर्स संघाने ॲड. सुजाता रावते यांच्या संघाला पराभूत केले. ॲड. सबा अन्सारी यांनी महिला विभागात वुमन ऑफ द मॅच आणि वुमन ऑफ द सिरीज ही पारितोषिके देण्यात आली.

ॲड. अनिश कल्व्हर्ट आणि ॲड. दिगंबर देसाई यांनी नियोजन केले. पोलिस संघाचे सागर खांडेकर, पोलिस संघाचे नाईक, न्यायाधीश संघाचे कदम, न्या. भोसले, वकील संघाचे वैभव पाटील, आशीष मिश्रा, मंथन डगली, हितेश जावकर, गिरीधर म्हात्रे, सबा अन्सारी यांनी सामनावीर ही पारितोषिके जिंकली. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे बक्षीस न्यायाधीश देशपांडे यांनी पटकाविले; तर सर्वोत्तम फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सागर खांडेकर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून आशीष मिश्रा यांना गौरविण्यात आले.

समारोप व पारितोषिक वितरण सोहळ्यास महापौर प्रवीण शेट्टी, जिल्हा सत्र न्यायाधीश देशपांडे, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. गजानन चव्हाण, ॲड. उदय वारुंजीकर, ॲड. रवी ईराणी, ॲड. अलीम शेख आदी उपस्थित होते.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News