स.प महाविद्यालयात रंगला कवितांचा संम्मेलन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 February 2020

‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ असा मायबोलीविषयीचा अभिमान प्रत्येक जण जपतो.

पुणे : ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ असा मायबोलीविषयीचा अभिमान प्रत्येक जण जपतो. ‘अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या’ मराठीचं प्रवाही तेज तरुणाईला भुरळ घालत राहतं. म्हणूनच, महाविद्यालयात जाणारी आजची तरुणाईदेखील या भाषेचा वारसा घेऊन अभिव्यक्त होत असते. याच मराठी भाषेच्या समृद्धीचं दर्शन घडविणारा ‘सकाळ’ आणि सर परशुरामभाऊ महाविद्यालय घेऊन येत आहे ‘कवितांचा इंद्रधनू’...

मराठी भाषा दिन म्हणजे कुसुमाग्रजांची अर्थात वि. वा. शिरवाडकर यांची जयंती गुरुवारी आहे. त्यानिमित्तानं त्यांच्या साहित्य सहवासात तरुण कवी जुन्या-नव्या कवितांचे रंग संगीताच्या साथीनं उलगडणार आहेत. ‘सकाळ’ आणि सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचं कला मंडळ, वाङ्‌मय मंडळ आणि मराठी विभाग यांनी संयुक्तपणे महाविद्यालयाच्या ए. व्ही. हॉलमध्ये सकाळी साडेदहा वाजता हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

तरुण पिढीची नाळ ओळखणारा लेखक, गायक आणि संगीतकार डॉ. आशुतोष जावडेकर हे सकस मराठी कवितांचं गायन करणार आहेत. त्यांना गिटारवर पराग जोशी साथसंगत करणार आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थीदेखील यात भाग घेऊन कवितांचं अभिवाचन करणार आहेत. मराठी कवितेच्या या रंगवर्षावात सहभागी व्हावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News