आयआयटी होम प्रवेश परीक्षेसाठी आॅनलाईन नोंदणी सुरु

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 February 2020

नागपूर : आयआयटी होमने सहा एप्रिल २०२० रोजी घेण्यात येणाऱ्या प्रवेश स्क्रिनिंग परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. एसएसई २०२२ जेईई मेन्स आणि ॲडव्हान्स परीक्षेच्या तयारीसाठी आयआयटी होमच्या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात येते.

नागपूर : आयआयटी होमने सहा एप्रिल २०२० रोजी घेण्यात येणाऱ्या प्रवेश स्क्रिनिंग परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. एसएसई २०२२ जेईई मेन्स आणि ॲडव्हान्स परीक्षेच्या तयारीसाठी आयआयटी होमच्या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात येते.

ऑनलाइन नोंदणीचा पहिला टप्पा २० ते २७ फेब्रुवारी २०२० पर्यंत खुला आहे. दुसरा टप्पा २० ते २७ मार्चपर्यंत खुला राहणार आहे. मार्च २०२० मध्ये दहावी बोर्ड परीक्षेला बसणारे विद्यार्थी यात नोंदणीसाठी पात्र आहेत. इयत्ता आठवी ते दहावीच्या गणित व विज्ञान अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा असेल.इच्छुक उमेदवारांना ५०० रुपये शुल्क भरून ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बॅंकिंगद्वारेही भरण्याची सुविधा आहे. एएसईच्या नोंदणी करताना दहावीची परीक्षा दिल्याच्या प्रवेशपत्राची नोंदणी करणे अनिवार्य आहे.

एएसई नोंदणीच्या वेळेस अडचण येऊ नये म्हणून मार्गदर्शक व्हिडिओ आहे. त्यात एएसई नोंदणीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. त्यात महत्त्वपूर्ण तारखा, मार्गदर्शन चर्चासत्र, निकाल, परिचय सत्राचा समावेश त्या व्हिडिओमध्ये आहे. आयआयटी-होमच्या यू-ट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहेत. ऑनलाइन नोंदणी स्लॉटदरम्यान आयआयटी-होम आठवड्याच्या दिवसातील सकाळी ११ ते संध्याकाळी पाच वाजतापर्यंत मार्गदर्शनासाठी सज्ज राहणार आहे.दरवर्षी संपूर्ण भारतातून तीन हजारांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेसाठी नोंदणी करीत असतात.

गेल्या वर्षभरापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेच्या अडचणीवर मात करण्यासाठी एएसई हिंदीमध्येही घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एएसई एकाच वेळी नागपूर, अमरावती आणि चंद्रपूर या तीन शहरांमध्ये विविध केंद्रांवर घेण्यात येते. आयआयटी-होमचे नागपूर शहरात फक्त एक केंद्र आहे.
आयआयटी-होम गेल्या २३ वर्षांपासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन करीत आहे. या परीक्षेत यश मिळावे, या उद्देशाने प्रशिक्षित शिक्षक संस्थेत कार्यरत आहेत. आयआयटी-होम गेल्या अनेक वर्षांपासून अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत चमकदार कामगिरी करीत आहे.

२०१९ साली २०५ आयआयटी होमचे विद्यार्थी जेईई ॲडव्हान्ससाठी पात्र ठरले आहेत. ६६६ विद्यार्थ्यांपैकी ५६४ विद्यार्थ्यां जेईई मेन्समध्ये पात्र ठरले होते. आयआयटी-होमच्या वेदांत बोरकुटे यांनी ओबीसी-पीडब्ल्यूडी प्रकारात जेईई ॲडव्हान्समध्ये पहिला क्रमांकाचे रॅकिंग मिळविले होते. माहितीसाठी न्यू रामदासपेठ, काछीपुरा गार्डन, इस्ट हायकोर्ट रोड येथे ०७१२-२५४०२९६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News