आता मल्टीप्लेक्स देखील अहोरात्र सुरू राहणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 March 2020

राज्य सरकारने घेतलेल्या नाईट लाईफच्या निर्णयाचे मल्टिप्लेक्‍स मालकांनी स्वागत केले आहे.

मुंबई : चित्रपट रसिकांना आता मल्टिप्लेक्‍समध्ये मध्यरात्री चित्रपट पाहता येणार आहे. मुंबईतील मल्टिप्लेक्‍समधील नाईट लाईफ येत्या २४ मार्चपासून सुरू होत आहे. रोहित कुमार दिग्दर्शित आणि अभिनेता अक्षय कुमार याचा "सूर्यवंशी' चित्रपटाने याचा प्रारंभ होणार आहे. त्यामुळे चित्रपट रसिकांना मध्यरात्री हा चित्रपट पाहता येणार आहे. मात्र सिंगल स्क्रीनला अजूनही सरकारने परवानगी दिलेली नाही, असे सिंगल स्क्रीन असोसिएशनने सांगितले आहे.

राज्य सरकारने घेतलेल्या नाईट लाईफच्या निर्णयाचे मल्टिप्लेक्‍स मालकांनी स्वागत केले आहे. अक्षय कुमारचा "सूर्यवंशी' चित्रपट २४ मार्च रोजी प्रदर्शित होत सल्याने रसिकांना मध्यरात्री हा चित्रपट पाहता येणार आहे. पीव्हीआर मल्टिप्लेक्‍सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी असा प्रयत्न ``लव आज कल २' या चित्रपटाच्या निमित्ताने केला होता. सिनेमा ओनर्स ऍण्ड एक्‍झीबीटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष नितीन दातार म्हणाले, की सिंगल स्क्रीनला सरकारने रात्रीचे शोज्‌ लावण्यास अजून परवानगी दिलेली नाही. तरीही एक वेगळा प्रयोग म्हणून त्यांना परवानगी द्यायला, हरकत नाही.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News