आता डॉक्‍टरांना वौविध्याने नटलेला निसर्गही न्याहाळण्याची संधी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 February 2020
  • डॉक्‍टरांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी संस्थेचा प्रयत्न सुरू आहे. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.
  • सायकलिंगमुळे तंदुरुस्ती वाढली आहे. शिवाय सिस्केपमुळे परिसरातील निसर्गाचे ज्ञानही अवगत होत आहे.  

महाड : डॉक्‍टरांचे जीवन तणावमुक्‍त असावे, यासाठी महाडमधील सिस्केप संस्थेने डॉक्‍टरांसाठी ‘सायक्‍लॉन डॉक्‍टर्स सायकलिंग क्‍लब’ स्थापन केला आहे. या सायकलिंग क्‍लबच्या माध्यमातून डॉक्‍टरांना दररोजचा व्यायामही होत आहे. शिवाय वौविध्याने नटलेला निसर्गही न्याहाळण्याची संधीही मिळत आहे. ही सायकल फेरी महाड ते मांडले, कुर्ले, राजेवाडी, सव अशा वेगवेगळ्या मार्गावर चालवली जाते. 

डॉक्‍टरांचे जीवन तणावमुक्त राहण्यासाठी महाडमधील ‘सिस्केप’ संस्थेने पुढाकार घेतला आहे. सिस्केप संस्थेचे अध्यक्ष प्रेमसागर मिस्त्री यांनी महाडमधील सुमारे २० डॉक्‍टरांना एकत्रित करून सायक्‍लॉन डॉक्‍टर्स सायकल क्‍लब स्थापन केला आहे. या सायकलिंग क्‍लबला १ डिसेंबरला सुरुवात करण्यात आली. 

पहाटेपर्यंत किंवा मध्यरात्री उशिरापर्यंत काम करणारे डॉक्‍टर दररोज न चुकता या सायकलिंगसाठी हजेरी लावतात. दररोज सुमारे २० किलोमीटर अंतराचा प्रवास सायकलने केला जातो. या सायकलिंग क्‍लबमध्ये आदित्य महामुणकर, श्रीकांत रानडे, सुनील शेठ, राहुल सुकाळे, अजित पुल्ले, जितेंद्र खाजगीवाले, आशीष भोसेकर, जितेंद्र पावरा, सेतुल भारंबे यांच्यासह मोठ्या संख्येने डॉक्‍टर सहभागी झाले आहेत.

सदस्यांकडून मार्गदर्शन

महाड ते मांडले, कुर्ले, राजेवाडी, सव अशा वेगवेगळ्या मार्गावर सायकल चालवली जाते. या वेळी या भागातील वौविध्याने नटलेला निसर्गही न्याहाळण्याची संधी डॉक्‍टरांना मिळते. या सायकलवारीत सिस्केपचे दोन-चार कार्यकर्तेही दररोज हजेरी लावतात. या फेरीमध्ये दिसणारी झाडे, पक्षी, वनस्पती त्यांचे निरीक्षण केले जाते. वनस्पती तसेच फुलझाडांची माहिती सिस्केप सदस्याकडून डॉक्‍टर घेत असतात. शिवाय व्यायाम, सूर्यनमस्कार व योगासनेही डॉक्‍टर यादरम्यान करतात. सायकल फेरी पूर्ण झाल्यानंतर फळांचा आहारही केला जातो. गेले दोन महिने सुरू असलेल्या सायकलिंग क्‍लबमुळे डॉक्‍टरांमध्ये उत्साह आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News