आता महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये आंतराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 6 March 2020
  • आंतराष्ट्रीय शिक्षण मंडळ सुधारित आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम तयार करेल

गेल्या काही वर्षांपासून राज्यातील ८१ शाळांमध्ये आंतराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण सुरु होते . परंतु आता एकसारखे व आंतराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण राज्यातील सर्वच शाळांमध्ये सुरु करावे अशी योजना शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी सभागृहात मांडली .

महाराष्ट्र राज्यात सध्या जिल्हा परिषदेच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण ६६ हजार ३३ शाळा कार्यरत आहे . परंतु राज्य सरकारने आंतराष्ट्रीय अभ्यासक्रम बरखास्त केले त्यामुळे पालकांच्या मनात मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला. हा संभ्रम दूर करण्याकरीत शिक्षण मंत्री यांनी याबाबत स्पष्टीकारण दिले की, सुरवातीला हे नवे आंतराष्ट्रीय शिक्षण मंडळ सुधारित आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम तयार करेल व हा अभ्यासक्रम सुरवातीला फक्त ८१ शाळांमध्ये पाचवीच्या वर्गांना  शिकवलं जाणार आहे व पुढील वर्षांपासून उर्वरित सर्व शाळांमध्ये सुधारित अभ्यास क्रम शिकवलं जाईल .      
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News