दिव्यांग विद्यार्थ्याने रायगड चढून लिहिला नवा अध्याय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 7 March 2020
  • समुद्रसपाटीपासून २८५१ फूट उंच असलेल्या या गडावर जाण्यासाठी सूर्य देवतेची वाट न पहाता ‘खूबलढा’ बुरुजापासून प्रेरणा घेत गडावरील कडे कपाऱ्यांना वंदन केले.

म्हसळा : सेरेब्रल पाल्सी रोगाने ग्रस्त असलेल्या १६ वर्षीय ऋषिकेश शीतल सुदाम माळी या एआयजे म्हसळा या महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने नुकताच रायगड किल्ला चढून एक नवा अध्याय लिहला आहे. सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रेरणादायी काम करत त्याने ‘पंगू लंघयते गिरिम’ ही प्रार्थना खरी ठरवली.पाचाड येथे जाऊन राजमाता जिजाऊ यांच्या परमपुण्य समाधीस्थळास नमन करून आणि आशीर्वाद घेऊन ऋषिकेशने या गिरिभ्रमणास सुरुवात केली.

समुद्रसपाटीपासून २८५१ फूट उंच असलेल्या या गडावर जाण्यासाठी सूर्य देवतेची वाट न पहाता ‘खूबलढा’ बुरुजापासून प्रेरणा घेत गडावरील कडे कपाऱ्यांना वंदन केले.‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी-जय शिवाजी’ या स्फूर्तिदायी घोषणा देत ऋषिकेशने आगेकूच केली. शिरकाई देवीचे दर्शन घेत, अवघ्या अडीच तासांत सूर्याबरोबरच त्याला सूर्यासम तेज असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे साक्षात दर्शन घडले. महादरवाजा, गंगासागर तलाव, पालखी दरवाजा, मेणादरवाजा, राजभवन, राणीमहल, रत्नशाळा, राजसभा, नगारखाना, बाजारपेठ येथील हिंदवी स्वराज्याच्या राजधानीचा सुवर्णाक्षरांनी लिहलेला तहानभूक विसरून, पदभ्रमण करत जाणून घेतला.

पुढे ‘हर हर महादेव’ची गर्जना करत ऋषिकेश जगदिश्वर मंदिरात आणि प्रत्यक्ष शिवअवतार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर गड सर करताना शिवभक्त ऋतुजा घरफाळकर (अमरावती), शिवप्रसाद वाघमारे (तुळजापूर, ऊस्मानाबाद), संजय लव्हाळे (माजलगाव बीड), पत्रकार मित्र कैलास कदम, ऋषिकेश सूर्यवंशी (वाशी, मुंबई), प्राध्यापक वर्ग दयानंद कॉलेज पुणे यांनी; तसेच जय मल्हार हिरकणवाडी रायगड व लामजे बंधू पाचाड रायगड यांनी आणि गडावर चढणाऱ्या प्रत्येक शिवप्रेमींनी ऋषिकेशच्या जिद्द व धाडसाला सलाम केला. राधानगरी, कोल्हापूर येथील कुंभार मॅडम यांनी त्यांच्या शालेय विद्यार्थ्यांसमोर गडावरच राजसभेत ऋषिकेशचे शिवप्रतिमा देऊन कौतुक केले. ऋषिकेशवर रायगड मोहीम सर केल्याबद्दल शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News