एसएनडीटी विद्यापीठाचे जाळे संपूर्ण राज्यभर पसरणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 February 2020

राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग प्रयत्न करत आहे.

मुंबई: ग्रामीण भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत आणि त्यांना शिक्षणाच्या सर्व सोई-सुविधा मिळाव्यात म्हणून श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाचे सक्षमीकरण केले जाणार आहे. त्यासाठी एसएनडीटी विद्यापीठाचा संपूर्ण राज्यात विस्तार करण्याबाबत अंतिम निर्णय तीन महिन्यांत घेण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी दिली. 

राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग प्रयत्न करत आहे. ग्रामीण भागातील अनेक मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तीन महिन्यांत एसएनडीटी विद्यापीठाच्या विस्ताराबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे सामंत म्हणाले. शिक्षणाच्या अधिकाधिक सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंत्रालय, शिक्षण विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत राज्यातील जिल्ह्यांचा आढावा घेण्यात येईल. त्यानुसार एसएनडीटीसह अन्य विद्यापीठांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News