राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत वैष्णवीला दुहेरी जेतेपजदाचा मान

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 February 2020

ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए), इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन (आयटीएफ) आणि एशियन टेनिस फेडरेशन (एटीएफ) यांच्या मान्यतेने डेक्कन जिमखाना क्‍लबच्या टेनिस कोर्टवर संपलेल्या या स्पर्धेच्या एकेरीत वैष्णवी आडकरने अंतिम लढतीत लक्ष्मी अरुणकुमारचा पराभव केला. 

पुणे : एमएसएलटीए व अदर पूनावाला महाराष्ट्र अकादमी आयोजित सोळा वर्षांखालील गटाच्या अखिल भारतीय मानांकन राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात पुण्याच्या वैष्णवी आडकरने दुहेरी विजेतेपदाचा मान मिळविला.

ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए), इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन (आयटीएफ) आणि एशियन टेनिस फेडरेशन (एटीएफ) यांच्या मान्यतेने डेक्कन जिमखाना क्‍लबच्या टेनिस कोर्टवर संपलेल्या या स्पर्धेच्या एकेरीत वैष्णवी आडकरने अंतिम लढतीत लक्ष्मी अरुणकुमारचा ६-२, ६-३ असा सरळ पराभव केला. उपांत्य फेरीत वैष्णवी आडकरने साई भोयरला ६-१, ६-० असे तर उपांत्यपूर्व फेरीत सोनल पाटीलला ६-४, ६-० असे नमविले होते. दुहेरीत वैष्णवी आडकर व लक्ष्मी अरुणकुमार या जोडीने सुर्यांशी तन्वर व साई भोयर या जोडीचा ६-२, ६-३ असा पराभव केला होता. विजेती वैष्णवी आडकर अभिनव प्रशालेत नववी इयत्तेत शिकत असून केदार शहाच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News