मुंबईकर पृथ्वी शॉला सलामीला येण्याची मिळणार संधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 February 2020
  • न्युझीलंडविरूद्ध टी 20 मालिकेत भारताने 5-0 ने विजय मिळवला मात्र आता भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध वन-डे मालिकेचा सामना करावा लागणार आहे.
  • त्यामुळे सध्या संघामध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भारत विरूद्ध न्यूझीलंड या टी 20 मालिकेत भारतीय संघाने मोठ्या दमदार पद्धतीने सुरवात केली. न्युझीलंडविरूद्ध टी 20 मालिकेत भारताने 5-0 ने विजय मिळवला मात्र आता भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध वन-डे मालिकेचा सामना करावा लागणार आहे.

भारत आणि न्युझिलंडच्या 3 वन डे सामन्याची सुरवात बुधवार पासुन होणार आहे. तसेच भारतीय संघाचा सलामीवीर फलदांज रोहित शर्मा याला झालेल्या दुखापतीमुळे तो या सामण्यात कदाचित खेळताना दिसणार नाही. त्यामुळे सध्या संघामध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

दुखापत झाल्यामुळे शिखर धवनला सुद्धा  भारतीय संघामध्ये आपले स्थान टिकवता आलेले नाही, त्यामुळे अशा चिंताजनक वातावरणामध्ये रोहित शर्माच्या वतीने मयांक अग्रवालला आणि शिखर धवनच्या वतीने सलामीला येण्याची संधी मुंबईकर पृथ्वी शॉला मिळणार असल्याचे दिसुन येत आहे. 

पहिल्या वन-डे सामन्या अगोदर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांनी काही इशारे दिले होते की, ऋषभ पंतला वन-डे मालिकेत संधी मिळण्याचे प्रयत्न कमी असल्याचे दिसत आहे. तसेच पत्रकार परीषदेमध्ये हेही सांगितले की, लोकेश राहुलला यष्टीरक्षणाची जबाबदारी  असल्यामुळे मी फलंदाजीच्या मधल्या फळीत खेळणार आहे, असे त्याने स्पष्ट केले. त्यामुळे सर्वांच्या नजरा या आता भारतीय संघ हा पहिल्या वन-डे सामन्यात कशी भुमिका बजावणार याच्याकडे लागल्या आहेत.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News