मुंबई महापौर स्पर्धांना एप्रिलपर्यंत स्थगिती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 16 March 2020
  •  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्रात विविध उपाय केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता मुंबई महापौर क्रीडा स्पर्धाही लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाला आहे.

मुंबई : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्रात विविध उपाय केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता मुंबई महापौर क्रीडा स्पर्धाही लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाला आहे. या स्पर्धा सध्या तरी एप्रिलच्या मध्यापर्यंत होणार नाहीत, असे सांगितले जात आहे.

मुंबई महापौर स्पर्धा जवळपास चाळीस खेळांसाठी होत असते. त्यातील कॅरमसारख्या काही खेळांचीच स्पर्धा झाली आहे. उर्वरित खेळांच्या स्पर्धा मूळ कार्यक्रमानुसार आगामी काही आठवड्यांत होणार होत्या, पण आता त्या लांबणीवर टाकल्या आहेत. संबंधित क्रीडा संघटनांना याबाबतचा निर्णय कळवला आहे, असेही या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई महापौर कबड्डी स्पर्धा २६ ते २९ मार्चदरम्यान होती. ही स्पर्धाही अर्थातच लांबणीवर पडली आहे. खो-खोसह अनेक खेळांनी स्पर्धा एप्रिल- मेमध्ये घेण्याची यापूर्वीच तयारी दर्शवली होती.

मुंबईतील कबड्डी स्पर्धा स्थगित

मुंबई शहर तसेच उपनगर कबड्डी संघटनेने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व स्पर्धा स्थगित केल्या आहेत. महाराष्ट्र सरकारकडून पुढील सूचना येईपर्यंत मुंबई शहर तसेच उपनगरात कोणतीही कबड्डी स्पर्धा होणार नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News