मोबाइलचा अतिवापर ठरु शकतो घातक

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Monday, 3 February 2020

विद्यार्थी मोबाईलचा वापर ज्ञानार्जनाऐवजी गैरवापर करीत असून आजचा युवा विद्यार्थी आपल्या ध्येयापासून दूर जात आहे.

अलीकडच्या काळात मोबाईलच्या सतत वापरामुळे विद्यार्थी मोबाईलचा वापर ज्ञानार्जनाऐवजी गैरवापर करीत असून आजचा युवा विद्यार्थी आपल्या ध्येयापासून दूर जात आहे. मोबाईल ही आपली जरी गरज असली तरी त्याचा वापर विद्यार्थ्यांनी नेमका अभ्यासाठीच करावा, असा सल्ला येथील राजेंद्र ऊर्फ बाबा व्यास महाविद्यालयाद्वारे आयोजित २५ वर्षे रौप्य  महोत्सवात उपस्थित विद्यार्थ्यांना आरती देशमुख यांनी दिला.

अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्रसिंह व्यास होते. उद्‌घाटन तुरुंग अधिकारी दिलीपसिंह गिरासे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून रोटेले इन्स्टिट्यूड ग्रुपचे अध्यक्ष चंदनसिह रोटेले, आरती देशमुख, जि. प. सदस्य सलील देशमुख, पं. स. सदस्य अरुण उईके, प्राचार्य रमेश रघटाटे, माजी प्राचार्य अविनाश  आपटे, दामोदर कुहिटे, सुरेश कडू, संस्था सदस्य दिलीपभाऊ जाऊळकर, दुर्गाप्रसाद पांडे,  प्रेमिला चंदेल, इंदूताई जाधव, सरपंच केशवराव धुर्वे, उपसरपंच स्वप्नील व्यास,  ग्रा. पं. सदस्य संजयराव राऊत, बाळासाहेब जाधव, मोहनराव ठवळे, सुभाष ठवळे, रमेश तायवाडे, बंडू राठोड, विनोद माकोडे, प्यारूभाई पठाण, गोपाल माकोडे, हरिदास मडावी, श्रीमती झाडे, श्रीमती गजबे व मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते.

याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. १९९४ ला सुरू झालेले महाविद्यालय हे ग्रामीण होतकरू विद्यार्थ्यांचा आधार ठरत आहे. या ग्रामीण परिसरातील ४३ खेड्यातील गरीब विद्यार्थी व मुलींकरिता हे एकमेव पदवी घेण्याचे परिसरातील महाविद्यालय असल्याचे अनेक माजी  विद्यार्थ्यांनी मत व्यक्‍त करताना सांगितले. 

क्रीडा, सांस्कृतिक, वादविवाद सामान्य ज्ञान असे विविध ३ दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संचालन प्रा. डॉ. लोमेश्वर घागरे  यांनी केले. आभार प्रा. डॉ.गोपीचंद कठाणे यांनी मानले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News