'महिंद्रा'कडून आंतरराष्ट्रीय फुटबॅाल स्पर्धेचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 February 2020

महिंद्र ॲन्ड महिंद्र कंपनीतर्फे किलबिल शाळेच्या मैदानात नुकत्याच आंतरविभागीय फुटबॉल स्पर्धा झाल्या.

नाशिक : महिंद्र ॲन्ड महिंद्र कंपनीतर्फे किलबिल शाळेच्या मैदानात नुकत्याच आंतरविभागीय फुटबॉल स्पर्धा झाल्या. यात कंपनीच्या टूल ॲन्ड डाय संघाने अंतिम सामन्यात बाजी मारली.

स्पर्धेत एकूण आठ विभागांनी भाग घेतला. स्पर्धेतील सामन्यांच्या उद्‌घाटन कार्यक्रमास कार्मिक उपमहाव्यवस्थापक जितेंद्र कामतीकर, कार्मिक वरिष्ठ व्यवस्थापक मोहन कुमार, प्रसाद घाटे, कामगार संघटनेचे अध्यक्ष योगेश चव्हाण, सरचिटणीस सोपान शहाणे, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, सचिव लॉरेन्स भंडारे, सहचिटणीस बाळा काणकेकर आदी उपस्थित होते. अंतिम सामन्यात टूल ॲन्ड डॉय प्लांट ‘अ’ संघाने प्लांट टू ‘ब’ सघांचा ३-० असा पराभव करून विजेतेपद मिळविले.  

दरम्यान, विजेत्या प्लांट ‘अ’ संघाकडून कर्णधार अनुपम नायक, सतीश मुडी, शल्तीएल भंडारे, सफवान अली, उमेर खान, संजीव गुरू आदी खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. कार्मिक विभागाचे अधिकारी व फुटबॉल खेळाडू सुनील भंडारे, विकास झिंजुर्डे, प्रसाद पंडित, महिंद्र वेल्फेअर अधिकारी प्रिया पुजारी, वंदना अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिंद्र स्पोर्ट क्‍लबचे इरफान खान, संदीप भावनाथ, राकेश खंडीझोड, सचिन पाटील, शशी नायर आदींनी संयोजन केले. विजेत्या संघाला कार्मिक उपमहाव्यवस्थापक श्री. कामतीकर व महिंद्र हेल्थ विभागाचे वरिष्ठ अधिकारी विनय पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News