महाराष्ट्र राज्य परिषदेतर्फे विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली शिष्यवृत्ती परीक्षा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 18 February 2020

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता पाचवीसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, तर आठवीसाठी पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी  घेण्यात आली. 

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता पाचवीसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, तर आठवीसाठी पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी  घेण्यात आली. 

जिल्ह्यातून  इयत्ता पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी २५  हजार  ३५२; तर इयत्ता आठवीच्या पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी १९ हजार ५९६ असे एकूण ४४ हजार ९४८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या परीक्षेत एकूण २ हजार ३८३ विद्यार्थी गैरहजर होते.

जिल्ह्यात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीसाठी १७१ केंद्र तर पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी १३३ केंद्र अशा एकूण ३०४ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. यात पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेस एकूण २५ हजार ३५२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पहिल्या पेपरला २४ हजार ३१ विद्यार्थी उपस्थित तर एक हजार ३२१ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. दुसऱ्या पेपला २४ हजार दोन विद्यार्थी उपस्थित होते. या पेपरलाही एक हजार ३५० विद्यार्थी अनुपस्थित राहिले.

इयत्ता आठवीच्या पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेला १९ हजार ५९६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यापैकी १८ हजार ५८० विद्यार्थ्यांनी पहिला पेपर दिला. त्यापैकी एक हजार १६ विद्यार्थी अनुपस्थित होते.दुसऱ्या पेपरला १८ हजार ५६३ विद्यार्थी प्रविष्ट झाले. पैकी एक हजार ३३ विद्यार्थी अनुपस्थित राहिले, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांनी दिली. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News