महाराष्ट्रात दीड लाखांनी रोजगार घटले . 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 6 March 2020
  • राज्यातील बेरोजगारीदर ८.३ टक्के. 
  • विदेश गुंतवणुकीचा टक्का ही घसरल्याचे दिसत आहे अशी चिंता वित्तमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.  

वित्तमंत्री अजित पवार यांनी आर्थिक अहवाल मांडला असता राज्याचे आर्थिक चित्र समाधान कारक नाही असे सांगितले . यावेळी त्यांनी राज्यातील बेरोजगारीदर ८.३ टक्के असून बेरोजगारीत दीड लाखांची वाढ झाली आहे असे नमूद केले . वर्ष २०१८-२०१९ मध्ये महाराष्ट्रात ७३ लाख ५० हजार रोजगार परंतू हा आकडा २०१९-२०२० मध्ये ७२ लाख तीन हजारांवर आला आहे . महाराष्ट्र सध्या इतर राज्यांच्या  मानाने बेरोजगारी मध्ये पुढे असून सध्या कर्नाटक ४.३ टक्के, गुजरात ४.१ टक्के आहे . 

विदेशी गुंतवणूकीच्या मुद्यावर आधीच्या सरकारनं खूप गाजावाजा  केला होता परंतु  विदेश गुंतवणुकीचा टक्का ही घसरल्याचे दिसत आहे अशी चिंता वित्तमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.  सध्या महाराष्ट्र विदेशी गुंतवणुकीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून पहिल्या क्रमांकावर कर्नाटक राज्य आहे. 

सन २०२९-२०२० मध्ये कृषी क्षेत्र , उत्पादन क्षेत्र , सेवा क्षेत्र यांमध्ये ही  घट झालेली दिसून येते. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र राज्याला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागत आहे . 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News