चला भाकरी पलीकडचं जगणं शोधुया!!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 4 March 2020

श्रमदानाबरोबर विद्यार्थ्यांना द्यानाचे धडे दिले. वेळेचे नियोजन डोळ्यासमोर ठेवून विशिष्ट गटाने खेड्यांना भेट देणे, जेवण बनवणे , साफसफाई करणे ही कामे पहाटे ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत अखंड चालू असतात. श्रमप्रतिष्ठान, लैंगिक शिक्षण, भुकेचे महत्त्व, शेतकरी आत्महत्या, बेटी बचाओ, कायद्याने वागा लोकचळवळ, टाळ्या शिवाय दिलं काय ?

तरुणाईना सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीची तसेच सहासीपणाची व स्वकष्टाची जाणीव व्हावी या उद्देशाने दरवर्षी तरुणाई शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. यंदा या शिबिराचे २८ वे वर्ष होते. ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. रविंद्र कोल्हे आणि समाजसेविका डॉ.स्मिता कोल्हे यांच्या संकल्पनेतून या शिबिराची सुरुवात झाली आहे. "इसलिये राह संघर्ष की हम चुने...." हे या शिबिराचे गीत आहे.

तरुणांच्या विचाराना चालना मिळण्यासाठी, तरुणांचे व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी आणि तरुणांचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी तरुणाई संस्था दरवर्षी तरुणाई शिबिराचे आयोजन करत असते. यावर्षी २८ व्या तरुणाई शिबिरासाठी ठाणे जिल्ह्यातून जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या अमित गायकवाड या विद्यार्थ्याची  निवड झाली तसेच याच शिबिरासाठी सेवाधारी म्हणून जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्रणाली पोळ या विद्यार्थिनीची निवड झाली तसेच नवीमुंबई आणि पालघर जिल्ह्यातून देखील विद्यार्थ्यांची निवड तरुणाई शिबिरासाठी झाली होती. २६ जिल्ह्यांमधून एकूण २९० विद्यार्थ्यांपैकी ७२ विद्यार्थ्यांची निवड २८ व्या तरुणाई शिबिरासाठी झाली. 28 वे  तरुणाई शिबिर बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सालईबन येथे भरवण्यात आले होते.

 

श्रमदानाबरोबर विद्यार्थ्यांना द्यानाचे धडे दिले. वेळेचे नियोजन डोळ्यासमोर ठेवून विशिष्ट गटाने खेड्यांना भेट देणे, जेवण बनवणे , साफसफाई करणे ही कामे पहाटे ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत अखंड चालू असतात. श्रमप्रतिष्ठान, लैंगिक शिक्षण, भुकेचे महत्त्व, शेतकरी आत्महत्या, बेटी बचाओ, कायद्याने वागा लोकचळवळ, टाळ्या शिवाय दिलं काय ? , आजच्या काळातील खेड्यांची स्थिती इत्यादी विषयांवर व्याख्यान देऊन तरुणांमध्ये आत्मीयता जागरूकता आणि बदलाची जाणीव करण्याचा प्रयत्न केला. सालईबन मध्ये शिक्षणाचा, तंत्रज्ञानाचा अभाव असूनही येथील संपन्न जैवविविधता व आपली संस्कृती आणि माणूसपण लोक कसे जपतात याची ओळख आजच्या तरुणांना करून देण्याचा हा एक प्रयत्न असतो.

शिबिरात ७२ विद्यार्थ्यांचे एकूण सात गट करण्यात आले. गटानुसार प्रत्येक गटाला कामे वाटली जात. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनिकेतील समता, एकता, स्वतंत्र, धर्मनिरपेक्ष,बधुंता, लोकशाही, समाजवाद या तत्वांच्या आधारे संघाची नावे ठेवण्यात आली होती. योगा / प्रार्थना, श्रमकार्य, आयना देखो, १०० ग्राम जिंदगी, मंथन, जिंदगी गुलझार है, प्रतिबिंब, लालटेन, नाईट वॉक , अॅक्टिविटी, सामाजिक खेळ अशा विविध संकल्पना या शिबिरात घेण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांसाठी जंगल सफारीचे आयोजन करण्यात आले होते, विद्यार्थ्यांनी आदिवासी गावांना भेट दिली.भाकरी पलिकडील खरे जीवन विद्यार्थ्यांना या तरुणाई शिबिरात जगायला मिळाले. सालईबन ही जागा विनोबा भावेंच्या भूदान चळवळीतून मिळाली आहे. या जागेचे संगोपन मंजित भाई हे करतात.सालईबनच्या सुमसाम जागेवर 2 वर्षात मंजीत भाईंनी 17500  झाडे लावली आणि त्यातील 80%  झाडे जिवंत ठेवण्यात त्यांना यश आले आहे. तरुणाई शिबिरात घालवलेले काही दिवस हे आयुष्यातील खरं सुवर्ण दिवस होते असे सहभागी विद्यार्थ्यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News